सहायक वनसंरक्षकाची वनरक्षकाला अश्लील शिवीगाळ
By Admin | Updated: August 6, 2016 00:03 IST2016-08-06T00:03:18+5:302016-08-06T00:03:18+5:30
स्थानिक वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत वनरक्षक एम.एस. राऊत पुसला बिटमध्ये सेवा देत आहेत.

सहायक वनसंरक्षकाची वनरक्षकाला अश्लील शिवीगाळ
निषेध : वनकर्मचाऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
वरूड : स्थानिक वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत वनरक्षक एम.एस. राऊत पुसला बिटमध्ये सेवा देत आहेत. घाटोळे यांच्या शेतातील सागवान वृक्षाची पाहणी व मोजामापाकरिता सहायक वनसरंक्षक अशोक कविटकर दुपारी आले असता त्यांनी उपस्थित वनरक्षक राऊत यांना क्षुल्लक कारणावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. मारण्याची धमकीही दिली. या घटनेचा वनविभागातील सेवारत कर्मचारी तसेच वनपाल, वनरक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध केला. तहसीलदार आशिष बिजवल यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. कारवाई न केल्यास १६ आॅगस्टपासून साखळी उपोषणाचा इशाराही दिला आहे.
धनोडी येथे घाटोळे यांचा शेतातील सागवानचा खसरा पाहण्याकरिता व मोजमापाकरिता सहायक वनसरंक्षक अशोक कविटकर आले होते. संबंधित अधिकाऱ्याच्या वागणुकीबाबत चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा १६ आॅगस्टपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार आशिष बिजवल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांतर्फे उपवनसरंक्षकांना निवेदनाद्वारे दिला.
यावेळी वनरक्षक एम.एस. राऊत, आय.एच. बारस्कर, व्ही.एम. अंबागडे, एस.एन गोसावी, व्ही.एस. धोटे, एस.व्ही.राऊत, आर.बी. मांडळे, डी.आर. दडाळे, के.एस. ठाकरे, एम.एस. गायधने, डी.एच वाळके, के.एच.सय्यद, जी.डी.साखरकर, एस.एच. सराटकर, व्ही.एच कास्देकर, डी.ए.सकर्डे, वनपाल आर.के. खोडे, पी.एन.ठाकरे, पी.एम.धुर्वे, मक्सूद खान, वनमजूर एम.टी घोडेराव, वसंत राठोड, सुखमन वाडीवे, एम.के.कुबडे, ए.बी.काझी आदी उपस्थित होते.