गृहपालाच्या दंडेलशाहीला सहायक आयुक्तांचा लगाम
By Admin | Updated: August 8, 2015 00:26 IST2015-08-08T00:26:48+5:302015-08-08T00:26:48+5:30
स्थानिक प्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहात रात्रीच्या वेळी सतत मुख्यालयी गैरहजर राहणाऱ्या कलाने नामक ....

गृहपालाच्या दंडेलशाहीला सहायक आयुक्तांचा लगाम
युवा सेना आक्रमक : मुलींना काढले बाहेर
नांदगाव खंडेश्वर : स्थानिक प्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहात रात्रीच्या वेळी सतत मुख्यालयी गैरहजर राहणाऱ्या कलाने नामक गृहपालाने वसतिगृहातील मुलींना चक्क वसतिगृहाबाहेर काढल्याने घटनास्थळी भेट दिल्यानंतर संतप्त झालेल्या समाजकल्याणच्या सहायक उपायुक्तांनी गृहपाल कलानेची चांगलीच कानउघाडणी केली व युवा सेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या तक्रारीवरून गृहपालावर योग्य कारवाई करणार असल्याचे पत्र सहायक उपायुक्तांनी युवा सेनेला दिले.
प्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी जी आॅनलाईन पद्धत वापरली जाते त्यामधील तांत्रिक अडचणीमुळे प्रवेशास पात्र असतानासुद्धा त्या मुलींचे नाव आॅनलाईन पद्धतीत समाविष्ट झाले नाही. परंतु वस्तीगृहात प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर जर शैक्षणिक सत्र सुरू झाले असेल व मागील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात जी विद्यार्थिनी वसतिगृहात प्रवेशीत असेल अशा विद्यार्थिनीला बाहेर काढण्याचा अधिकार गृहपालास नाही. ६ आॅगस्ट रोजी घडलेल्या या प्रकाराबाबत सहायक उपायुक्त फिस्के यांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत मुलींकडून घडलेला प्रकार सहायक उपायुक्तांनी गृहपालाच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार सर्व बाबींची शहानिशा केल्यानंतर गृहपालास मुख्यालयी हजर राहण्याची तंबी सहाय्यक उपायुक्तांनी दिली. गृहपालाने वस्तीगृहाच्या बाहेर काढलेल्या मुलींना वसतिगृहात राहण्याची अनुमती सहाय्यक उपायुक्तांनी दिली व घडलेल्या प्रकाराबाबत गृहपाल कलाने यांचेवर योग्य कारवाईचे पत्र युवा सेनेला दिले.