दहावीच्या परीक्षेत प्रात्यक्षिकऐवजी असायमेंट, बहिस्थ परीक्षकांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:38+5:302021-03-23T04:14:38+5:30
अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे. ...

दहावीच्या परीक्षेत प्रात्यक्षिकऐवजी असायमेंट, बहिस्थ परीक्षकांना ब्रेक
अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे. यात दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी लेखनकार्य (असायमेंट) असणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बहिस्थ परीक्षक असणार नाही, शाळा स्तरावरच प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन गुण पाठवावे लागणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यंदा कोविड-१९ च्या अनुषंगाने यंदा दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये परीक्षा केंद्र प्रवेशित शाळाच असणार आहे. तसेच बारावीच्या विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक शाखांतील विषयांची श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मू्ल्यमापन परीक्षा घेण्याचे स्वांतत्र्य संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे. दहावीतील विद्यार्थ्यांचे श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मू्ल्यमापन परीक्षा घेण्याचे स्वांतत्र्य शाळांना बहाल करण्यात आले आहे. मात्र, दहावीच्या लेखी परीक्षा आटोपल्यानंतर ते घेता येईल, अशी मुभा शाळांना बोर्डाने दिली आहे. परीक्षार्थ्यांना कोरोना नियमावलींचे पालन करून परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षार्थ्यांना पाण्याची बाटल, सॅनिटायझरची बाटल, मास्क सोबत ठेवावा लागेल. परीक्षेसाठी लेखनसाहित्य आणावे लागणार आहे. गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
----------------
असे आहे परीक्षांचे नियोजन
दहावीच्या लेखी परीक्षा : २९ एप्रिल ते २० मे २०२१
बारावीच्या लेखी परीक्षा : २३ एप्रिल ते २१ मे २०२१
दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा : २१ मे ते १० जून २०२१
बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा : २२ मे ते १० जून २०२१
अपंग विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा : २१ मे ते १ जून २०२१
--------------
दहावीच्या परीक्षेत प्रात्यक्षिक ऐवजी असायमेंट, बहिस्थ परीक्षक असणार नाही. प्रवेशित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा होणार असल्याने मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर वापरावे लागेल.
- शरद गोसावी, विभागीय अध्यक्ष, शिक्षण मंडळ