गुणवत्तेसाठी २८०० शाळांमध्ये मूल्यमापन चाचणी

By Admin | Updated: October 19, 2016 00:13 IST2016-10-19T00:13:17+5:302016-10-19T00:13:17+5:30

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक १ जिल्हाभरातील शाळांमध्ये १९ व २० आॅक्टोबरला पार पडणार आहे.

Assessment test in 2800 schools for quality | गुणवत्तेसाठी २८०० शाळांमध्ये मूल्यमापन चाचणी

गुणवत्तेसाठी २८०० शाळांमध्ये मूल्यमापन चाचणी

आज परीक्षा : शिक्षण विभागात तयारी पूर्ण 
अमरावती : विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक १ जिल्हाभरातील शाळांमध्ये १९ व २० आॅक्टोबरला पार पडणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीचे साधारण ४ लाख ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
सन २०१५-१५ पासून सुरू झालेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. यापैकीच संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा हा एक उपक्रम आहे. शाळेत दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुरुप अपेक्षित शैक्षणिक क्षमता संपादीत केली आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी घेण्यात येत आहे. १९ आॅक्टोबर रोजी प्रथम भाषा व २० आॅक्टोबर रोजी गणित याविषयाची परीक्षा होणार आहे. विशेष बाब म्हणजे राज्यस्तरावरुनच या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील पहिली ते आठवीचे जवळपास साडेचार लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. शिक्षण विभागातर्फे या चाचणीची तयारी पूर्ण करण्यात आली असून वाचन, लेखन, आकलन व उपयोजन तसेच संख्या ज्ञान व बेरीज यात एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, यासाठी ही चाचणी दिशादर्शक ठरणार आहे.
हे विद्यार्थी देणार चाचणी : जिल्हाभरातील शाळांमध्ये इयत्ता १ ते ८ च्या विद्यर्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणीत मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, आणि उर्दू माध्यमाचे विद्यार्थी चाचणी देणार आहेत.(प्रतिनिधी)

वर्षभरात तीन चाचण्या
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत वर्षभरातील तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना आहेत. त्यानुसार २८ व २९ जुलै रोजी पायाभूत चाचणी पार पडली, आता संकलित मूल्यमापन चाचणी १ झाल्यानंतर सत्राच्या अखेरीस चाचणी पार पडेल.

क्षमतेची होणार खात्री
नियमित विद्यार्थ्यांना किमान अपेक्षित क्षमता अवगत असणे आवश्यक आहे. यासाठी संकलित मूल्यमापन चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समज व क्षमतेची खात्री या चाचणीमुळे होईल या चाचणीतील गुणवत्तेच्या आधारे शाळेलाही श्रेणी दिली जाणार आहे.

Web Title: Assessment test in 2800 schools for quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.