मुरमाड मातीवर पसरविले डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST2021-07-18T04:10:01+5:302021-07-18T04:10:01+5:30

डवरगाव ते गुरुकुंज मोझरी रस्ता डांबरीकरणात सावळागोंधळ अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीला कर्मभूमीशी जोडणाऱ्या ...

Asphalting spread on murmad soil | मुरमाड मातीवर पसरविले डांबरीकरण

मुरमाड मातीवर पसरविले डांबरीकरण

डवरगाव ते गुरुकुंज मोझरी रस्ता डांबरीकरणात सावळागोंधळ

अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीला कर्मभूमीशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या निर्माणाधीन कार्यात व डांबरीकरणात प्रचंड सावळागोंधळ झाला आहे. अमरावती जिल्ह्याच्या आजी-माजी पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत या रस्त्याचे भूमिपूजन झाले होते, हे विशेष. दोन तालुक्यांच्या बांधकाम विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करणे क्रमप्राप्त झाले आहे.

अनेक महिन्यांपासून अतिशय संथगतीने चाललेल्या या रस्त्याच्या कामात प्रचंड उणिवा असून चक्क पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मुहूर्त साधण्यात आला. सोबतच या तेरा किलोमीटर रस्त्यावर उभारण्यात आलेल्या पुलसदृश रपट्याची काम संथ व निकृष्ट करण्यात आल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे. एकीकडे डांबरीकरण आणि दुसरीकडे पुलाचे अर्धवट बांधकाम अशी परिस्थिती या रस्त्याच्या निर्मितीच्या वेळी पाहायला मिळाली.

पावसाळा सुरू होऊनही मार्गातील अनेक रपट्यांची कामे अर्धवट आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मभूमी ते कर्मभूमी असा दुवा ठरणाऱ्या या रस्त्याचे बांधकाम गुणवत्तापूर्ण होणे क्रमप्राप्त होते. पण, तसे न होता चक्क पुलावर टाकण्यात आलेल्या मुरमाच्या मातीवर डांबरीकरण करण्यात आले. परिणामी अवघ्या तिसऱ्या दिवसांपासून त्या ठिकाणी डांबरीकरण उखडून गेले. डांबरीकरणाचा एकच थर सध्या देण्यात आला असून, रस्त्याचे खडीकरण आणि नंतर डांबरीकरण यात खूप अंतर पडले होते. त्यामुळे खडीकरणाचे अनेक ठिकाणी खड्ड्यात रूपांतर झाले. त्याची योग्य डागडुजी न करताच त्यावरच डांबरीकरण करण्यात आले. या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या प्रत्येक पुलावरचे डांबरीकरण उखडले आहे. प्रत्यक्षात रस्ता निर्मिती करताना मातीचा थर पूर्णतः खरडून काढून नंतर खडीकरणावर डांबरीकरण करणे क्रमप्राप्त असते. हा नियमच या रस्ता उभारणीत पायदळी तुडविला गेला.

----------------------------------------------------

बॉक्स

पावसाळ्याच्या तोंडावर डांबरीकरणाचा मुहूर्त

तिवसा-चांदूर रेल्वे रस्त्याची दुरुस्ती व गुरुकुंज मोझरी ते डवरगाव या अमरावती व तिवसा तालुक्यांच्या बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्याच्या निर्मितीचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर करण्यात आले. अमरावती- नागपूर महामार्गावर निर्माण झालेले जीवघेणे खड्डे बुजविण्याचे कामही चक्क पावसाळ्यात करण्यात आले आहे.

Web Title: Asphalting spread on murmad soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.