एएसआय वाघमारे यांना राष्ट्रपती पोलीस पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:15 IST2018-01-26T01:14:20+5:302018-01-26T01:15:16+5:30
शहर पोलीस दलात ३७ वर्षांच्या सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक दिलीप वाघमारे यांना प्रजाकसत्ताक दिनी आयोजित समारंभात राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान केले जाणार आहे.

एएसआय वाघमारे यांना राष्ट्रपती पोलीस पदक
ठळक मुद्देशहर पोलीस दलात ३७ वर्षांच्या सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल
अमरावती : शहर पोलीस दलात ३७ वर्षांच्या सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक दिलीप वाघमारे यांना प्रजाकसत्ताक दिनी आयोजित समारंभात राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान केले जाणार आहे. ते मूळचे अंजनगाव तालुक्यातील निमखेड बाजार येथील रहिवासी आहेत. १ मे २०१७ रोजी पोलीस महासंचालक पदकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. दिलीप वाघमारे हे १५ डिसेंबर १९७९ मध्ये पोलिस सेवेत दाखल झाले आहेत.राजापेठ पोलिस ठाण्यापासून त्यांनी आपल्या सेवेची सुरूवात केली आहे.याशिवाय शहराच्या बहूतांश ठाण्यासह गुन्हे शाखेत त्यांनी सेवा केली.