मुसळधार पावसाने आष्टी जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:09 IST2021-07-12T04:09:52+5:302021-07-12T04:09:52+5:30
टाकरखेडच्या झेडपी शाळा परिसरातही साचला तलाव, परिसरात मुसळधार पावसाचा फटका , फोटो - टाकरखेडा संभू : वादळी पावसाने नजीकच्या ...

मुसळधार पावसाने आष्टी जलमय
टाकरखेडच्या झेडपी शाळा परिसरातही साचला तलाव,
परिसरात मुसळधार पावसाचा फटका ,
फोटो -
टाकरखेडा संभू : वादळी पावसाने नजीकच्या आष्टी गावात नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला. सोबतच गजानन महाराज मंदिर परिसर व शांती नगर परिसरात समुद्रच साचला होता. टाकरखेडा संभू येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात देखील सर्वत्र पाण्याचा समुद्र साचल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय निर्माण झाली होती. ॉ
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार इतक्यातच शुक्रवारपासून पावसाने दिलासा दिला आणि पंधरा दिवसानंतर पावसाने पुनरागमन केले. रविवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पावसाचा परिसरात चांगलाच फटका सहन करावा लागला. यादरम्यान टाकरखेडा संभु येथील वीज पुरवठादेखील खंडित झाला होता.
110721\img-20210711-wa0062.jpg
आष्टी येथील गजानन महाराज मंदिर परिसरात साचलेले पावसाचे पाणी