आष्टातील यात्रा महोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:14+5:302021-02-05T05:33:14+5:30

मंगरूळ दस्तगीर :- विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत भिकुजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भरणारी यात्रा रद्द ...

Ashta Yatra Festival canceled | आष्टातील यात्रा महोत्सव रद्द

आष्टातील यात्रा महोत्सव रद्द

मंगरूळ दस्तगीर :- विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत भिकुजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शन घेण्यात घेता येणार आहे. मंदिरापर्यंत कोणीही येऊ नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त लावून गावबंदी केली आहे.

तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर वसलेले ७४० लोकसंख्येचे गाव तीर्थक्षेत्र आष्टा म्हणून विदर्भात परिचित आहे. दरवर्षी २९ जानेवारी रोजी संत भिकुजी महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यातील एक लाखांवर भाविक येतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सात दिवसीय यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान, पहाटे चार वाजता संत भिकुजी महाराज यांचे अमृतस्नान होणार असून, दिवसभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ सर्व भाविकांना ऑनलाइन दर्शनाच्या माध्यमातून घेता येणार आहे. भाविकांची घरीच बसून दर्शन घ्यावे, असे आवाहन संत भिकुजी महाराज विश्वस्त मंडळाने केले आहे.

Web Title: Ashta Yatra Festival canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.