आसेगाव पीएचसीचा कारभार ढेपाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST2021-02-12T04:12:48+5:302021-02-12T04:12:48+5:30

आसेगावपूर्णा : अलीकडे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश आहेत. असे ...

Asegaon PHC took over | आसेगाव पीएचसीचा कारभार ढेपाळला

आसेगाव पीएचसीचा कारभार ढेपाळला

आसेगावपूर्णा : अलीकडे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश आहेत. असे असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १५ दिवसांपासून एक श्वान कुजलेल्या अवस्थेत पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील या आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर होण्याकडे लोकांचे लक्ष लागले असताना ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीपूर्वी उपलब्ध केंद्र समस्यांचे माहेरघर बनले आहे. यात प्रामुख्याने पिण्याचे पाणी, विद्युत दिव्यांची अपुरी सेवा, भग्नावस्थेतील इमारत अंतर्भूत आहे. प्रसूतीगृहाकडील इमारतीला तडे गेल्याने येथील प्रसूती शस्त्रक्रिया बंद आहेत. त्या बंद खोल्यांमध्ये काही दिवसांपूर्वी कुजलेला श्वान आढळून आला. त्यानंतर आता दवाखान्याच्या इमारतीच्या मागील भागात कुजलेल्या अवस्थेत श्वान आढळून आला.

कोट

मृत श्वान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत किंवा आवारात नसून बाहेर आहे.

- समीना खान,

वैद्यकीय अधिकारी, आसेगाव पूर्णा

Web Title: Asegaon PHC took over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.