शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

‘युरिया गोडाऊनमध्ये आहे’ म्हणताच दुकानदाराच्या कानशिलात लगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 17:49 IST

हॉटेल व्यावसायिक नितीन मोहोडविरुद्ध तक्रार : शिवसेनेचा ठाकरे गटही आक्रमक

अमरावती : पाऊस न आल्याने पेरण्या थबकल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी पेरणी व मशागतीसाठी आवश्यक असलेल्या बियाणे व खत खरेदीसाठी कृषी केंद्राकडे धाव घेतली आहे. अन्य खतांच्या तुलनेत युरियाला अधिक मागणी असून, बाजारात त्या खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर युरिया उपलब्ध नसल्याची बतावणी करणाऱ्या कृषिसेवा केंद्र संचालकाला मारहाण करण्यात आली.

गुरुवारी दुपारी कॉटन मार्केट चौकातील कृषी समृद्धी या प्रतिष्ठानात ती घटना घडली. कृषिसेवा केंद्र संचालकाला मारहाण करणाऱ्या ऑटो युनियनच्या नितीन मोहोड यांच्यासह त्यांच्यासोबतच्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी कृषिसेवा केंद्र संचालकांनी पोलिसांकडे केली. सुमारे चार तास प्रतिष्ठाने बंद ठेवली. घटनेनंतर अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाने शहर कोतवाली गाठले तथा घटनेचा निषेध करून शहरातील सर्व कृषी साहित्य दुकाने बंद करण्यात आली.

पोलिस ठाण्यात शिष्टमंडळाने उपायुक्त विक्रम साळी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लेखी तक्रारदेखील करण्यात आली. त्याचवेळी शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारीदेखील नितीन मोहोड यांच्या सोबतीला आले. शिवसेनेचे सुनील राऊत व युवासेनेचे राहुल माटोडे यांनीदेखील युरियाच्या कृत्रिम तुटवड्याबाबत संबंधित कृषिसेवा केंद्र संचालकाला जाब विचारला. कृषी विभागाच्या वरदहस्ताशिवाय हा प्रकार शक्य नसल्याचा आरोप माटोडे यांनी केला. हा प्रकार न थांबल्यास प्रसंगी संबंधितांची धिंड काढण्याचा इशारा माटोडे यांनी दिला. कृषी अधिकाऱ्यांनी नियमित स्टॉक चेक करावा, शेतकऱ्यांना नेमके किती रुपयांचे बिल दिले जाते ते रेकार्ड तपासावे, अशी मागणी मोहोड यांनी केली.

नेमके घडले काय?

नितीन मोहोड यांनी आपल्या एका सहकाऱ्याला युरिया घेण्यास पाठविले. मात्र, काॅटन मार्केटमधील तीन दुकानदारांनी युरिया नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोहोड हे कृषी समृद्धी नामक प्रतिष्ठानात गेले. तेथे रितेश राठी यांना जाब विचारला. आधी युरिया नसल्याचे सांगणाऱ्या त्या दुकानदाराने आता मात्र युरिया गोडाऊनमध्ये असल्याचे सांगितले. त्यामुळे आधी नाही का म्हटले, अशी विचारणा करून मोहोड यांनी राठी यांच्या कानशिलात लगावली. तेथील तू-तू, मै-मै वाढल्याने कृषी अधिकारीदेखील तेथे पोहोचले. कृषिसेवा केंद्र संचालकाला मारहाण केल्याचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल झाला.

दहाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी रीतेश राठी यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक नितीन मोहोड यांच्यासह आठ-दहा जणांविरोधात जमाव जमविणे, मारहाण, शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड, कोतवालीचे ठाणेदार रमेश ताले यांनी परिस्थिती हाताळली. सुमारे दोन तास व्यावसायिक कोतवालीत होते.

कोतवालीत धाव

दरम्यान, अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाचे पदाधिकारी मिलिंद इंगोले, दिनेश कडू, विरेंद्र शर्मा, निलेश गांधी, मनोहर अग्रवाल, प्रवीण उंबरकर, गिरिश राठी व अन्य कृषी साहित्य विक्रेते कोतवालीत दाखल झाले. आम्ही कृषी विभागाच्या निर्देशाने योग्य काम करणारी माणसे आहोत. सध्या प्रत्येक दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी असल्याने व हंगामामुळे खते व बियाणे गोडावूनमध्ये हलविण्यात आले आहे. मोहोड यांनादेखील युरिया गोडाऊनमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले होते, असे ते म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती