तिवसा पं.स सभापतीपदी भाजपच्या अर्चना विरूळकर
By Admin | Updated: December 4, 2014 23:01 IST2014-12-04T23:01:02+5:302014-12-04T23:01:02+5:30
तिवसा पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी गुरूवारी सकाळी ११ वाजता सोडत काढण्यात आली. यात अनुसूचित जातीतील महिला राखीव पदाची सोडत निघाली. या प्रवर्गात मोडणाऱ्या एकमेव

तिवसा पं.स सभापतीपदी भाजपच्या अर्चना विरूळकर
औपचारिकताच शिल्लक : आरक्षण सोडतीत भाजपला ‘अच्छे दिन’
ंशेंदूरजनाबाजार : तिवसा पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी गुरूवारी सकाळी ११ वाजता सोडत काढण्यात आली. यात अनुसूचित जातीतील महिला राखीव पदाची सोडत निघाली. या प्रवर्गात मोडणाऱ्या एकमेव भाजपच्या सदस्य अर्चना विरुळकर या असल्याने सभापती पदासाठी त्यांचे नाव घोषित करण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहली आहे.
तिवसा पंचायत समिती सभापतीपदासाठी अनुसूचित जमाती महिला राखीव असे आरक्षण होते. परंतु तिवसा पंचायत समितीच्या तिवसा, वरखेड, वऱ्हा, कुऱ्हा, मार्डा व मोझरी गणात हे आरक्षण नव्हते. त्यामुळे ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात आली. त्यांच्या आदेशान्वये गुरूवारी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव व अनुसूचित जाती महिला राखीव अशा दोन प्रवर्गाच्या चिठ्या सोडतीसाठी टाकण्यात आल्या. तीन वर्षीय बालिका साक्षी धनराज जांभुळकर हिने सोडत काढली. यात अनुसूचित जातीच्या महिलांसाठी सभापती पद राखीव निघाले.
वरखेड गणाच्या भाजपच्या सदस्य अर्चना विरूळकर या नवीन सोडतीतील अनुसूचित जातीतील महिला सदस्य असल्याने त्यांची वर्णी सभापतीपदी लागणार आहे. यासाठी सभापतीपदाच्या निवडणूक कार्यक्रमाची केवळ औपचारिकताच शिल्लक आहे.