भावाकडून बहिणीला अर्वाच्य शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:13 IST2021-05-06T04:13:53+5:302021-05-06T04:13:53+5:30

ब्राह्मणवाड्यात पतीकडून पत्नीला मारहाण ब्राह्मणवाडा थडी : येथील गवईपुरा भागात मद्यधुंद पतीने पत्नी मोबाईलवर गाणे लावत नाही म्हणून तो ...

Arvachya abuses sister from brother | भावाकडून बहिणीला अर्वाच्य शिवीगाळ

भावाकडून बहिणीला अर्वाच्य शिवीगाळ

ब्राह्मणवाड्यात पतीकडून पत्नीला मारहाण

ब्राह्मणवाडा थडी : येथील गवईपुरा भागात मद्यधुंद पतीने पत्नी मोबाईलवर गाणे लावत नाही म्हणून तो फोडून टाकण्याची धमकी देत काठीने तिला जबर मारहाण केली. याप्रकरणी ३८ वर्षीय पत्नीने यांनी नीलेश गौतम गवई याच्याविरुद्ध ब्राह्मणवाडा पोलिसांत तक्रार दिली.

-------------

बडी संगत येथे उधारीच्या पैशांवरून मारहाण

अचलपूर : शहरातील बडी संगत येथे उधारीच्या पैशांवरून शेख चांद शेख उस्मान (५४) व त्यांच्या दोन भावांना मारहाण करण्यात आली. अचलपूर पोलिसांनी शेख घुडु शेख अब्बास, शेख रहीम शेख घुडु (४५), शेख हुसेन शेख घुडु, शेख राजा शेख गुडु यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. याच प्रकरणात शेख रहीम शेख घुडु यांच्या तक्रारीवरून शेख बिस्मिल्ला शेख उस्मान, शेख चांद शेख उस्मान, शेख सरदार शेख उस्मान, शेख कादर शेख उस्मान यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ४ मे रोजी ही घटना घडली.

--------------

Web Title: Arvachya abuses sister from brother