विष्णोरा येथे कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:01+5:302021-07-27T04:13:01+5:30
फोटो - शिरखेड २६ पी शिरखेड : मोर्शी तालुक्यातील विष्णोरा येथील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा कापण्यात आल्याने केल्याने चार ...

विष्णोरा येथे कृत्रिम पाणीटंचाई
फोटो - शिरखेड २६ पी
शिरखेड : मोर्शी तालुक्यातील विष्णोरा येथील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा कापण्यात आल्याने केल्याने चार दिवसांपासून
पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळपट्टी वसुली कमी व भरमसाठ वीज बील यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून, नागरिकांना भर पावसात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नागरीक ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढतील, असा इशारा अनिल ठाकरे व गावातील नागरिकांनी दिला आहे.
----------------
मोझरीत रास्ता रोको आंदोलन
फोटो - तिवसा २६ पी
तिवसा : पेट्रोल, डिझेल, सिलिंडर दरवाढ व केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीसमोर युवक काँग्रेस व युवा संघर्ष समिती यांच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागणी संदर्भात सोमवारी दुपारी १२ वाजता तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. केंद्र सरकारने सुधारीत उपाय योजना कराव्या, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात समिती अध्यक्ष जसबीर ठाकूर, काँग्रेस उपाध्यक्ष दिलीप काळबांडे, पंकज देशमुख, मुकुंद पुनसे, उपसभापती शरद वानखडे, अब्दुल सत्तार, प्रशांत प्रधान, लोकेश केने, रवींद्र हांडे, संजय चौधरी आदी सहभागी झाले.
----------------------
देशमुख महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ
फोटो - पी २६ चांदूर बी
चांदूर बाजार : स्थानिक कै. नारायणराव अमृतराव देशमुख महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ पार पडला. समारंभात बी.ए., बी.सी.ए. आणि एम.ए (भूगोल) अभ्यासक्रमाच्या उन्हाळी २०२० मध्ये पदवी व पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण पदवीकांक्षींना पदवीदान पार पडले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री वसुधा देशमुख होत्या. प्राचार्य एस.एन. देशमुख व स्वप्निल देशमुख हे प्रमुख अतिथी होते. प्राचार्य वनिता चोरे, भोरजार, पडोळे, वसुले, पवार, खडसे कर्मचारी व बहुतांश पदवीकांक्षी उपस्थित होते.
---------------
काशी नदीवरील बंधारा फुटला
फोटो - पी २५ काशी
काटपूर : मोर्शी तालुक्यातील काशी नदीला शनिवारी पुरामुळे काटपूर ते खोपडा रोडवरील पुलाजवळ बांधण्यात आलेला बंधारा फुटला. दोन दिवसांत पुरामुळे काटपूर-खाेपडा रस्त्याचा संपर्क तुटून वाहतूक बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा बंधारा तात्पुरता दुरुस्त करावा, अशी मागणी काटपूर, ममदापूर येथील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.