जिल्ह्यात ४० हजार ज्येष्ठ-कनिष्ठ गौरीचे आगमन
By Admin | Updated: September 2, 2014 23:23 IST2014-09-02T23:23:54+5:302014-09-02T23:23:54+5:30
भाद्रपदातल्या चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना झाल्यानंतर चवथ्या दिवशी म्हणजे सप्तमीला ज्येष्ठ गौरीची स्थापना केली जाते. सप्तमीला स्थापना, अष्टमीला जेवण व नवमीला विसर्जन असा अडीच दिवसांचा

जिल्ह्यात ४० हजार ज्येष्ठ-कनिष्ठ गौरीचे आगमन
सुरेश सवळे - अमरावती
भाद्रपदातल्या चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना झाल्यानंतर चवथ्या दिवशी म्हणजे सप्तमीला ज्येष्ठ गौरीची स्थापना केली जाते. सप्तमीला स्थापना, अष्टमीला जेवण व नवमीला विसर्जन असा अडीच दिवसांचा गौरी स्थापनेचा उत्सव भारतीय संस्कृतीत राज्यातील कानाकोपऱ्यात अत्यंत भक्तीभावाने साजरा केला जातो. ज्या कुटुंबात या पुजनाची परंपरा चालत आली ते कुटूंब त्याची आर्थिक परिस्थिती कितीही हलाखीची असो परिसरातील १० लोकांना तरी या पुजनाच्या प्रसादाचा लाभ देतोच. जिल्ह्याचा विचार केल्यास अमरावती शहरासह ग्रामीण भागात ४० हजारांवर गौरीचे आगमन झाले असून जिल्ह्यातील सुमारे २ हजार २ लोकवस्तीच्या गावात कमी-जास्त ४० हजार गौरीची स्थापना केल्याचा अंदाज आहे. आज या उत्सवानिमित्त जिल्ह्यात सुमारे २० लाख लोक प्रसादाचा (जेवण) लाभ घेणार आहे.
देवीच्या उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीत स्त्री शक्तीची उपासना केली जाते. कलासक्त गौरी अशा अनेक रूपात तिची आराधना केली जाते. वेदकाळापासून सुरू झालेला हा उत्सव आता समाजाच्या विविध घटकांना सामावून घेत परंपरागत पार पाडली जात आहे.