अश्लील व्हिडीओ फेसबुकवर टाकण्याची धमकी देणार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:11 IST2021-04-05T04:11:58+5:302021-04-05T04:11:58+5:30
अमरावती : अश्लील व्हिडीओ फेसबुकवर टाकण्याची धमकी देणारा एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घाटलाडकीवरून शुक्रवारी अटक केली. नीलेश ...

अश्लील व्हिडीओ फेसबुकवर टाकण्याची धमकी देणार अटकेत
अमरावती : अश्लील व्हिडीओ फेसबुकवर टाकण्याची धमकी देणारा एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घाटलाडकीवरून शुक्रवारी अटक केली.
नीलेश साहेबराव कुऱ्हाडे (२३ रा. राममंदिर चौक, घाटलाडकी) असे आरोपीचे नाव आहे. फेसबुक अकाऊन्ट बनवून त्यावर संदेश व अश्लील व्हीडीओ टाकण्याची धमकी एका अज्ञाताने दिल्याची तक्रार एका तरुणीने ब्राम्हणवाडा थडी ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याची डायरी सायबर ठाण्याला प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या मार्गदर्शन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी पथकातील पोलीस हवालदार सुनील बनसोड, विकास अंजीकर, शिपाई सागर थापड, रितेश वानखडे यांच्यासह तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक पध्दतीने व बुध्दी कौशल्य वापरून आरोपी निष्पन्न केला. त्यानंतर ब्राम्हणवाडा थडीचे एपीआय दीपक वळवी, पोलीस हवालदार रवींद्र शिंपी, पोलीस नाईक दिनेश वानखडे, सचिन भुजाडे यांच्या पथकाने आरोपी नीलेश कु-हाडेला अटक केली.