अस्तित्व लपवून फिरणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:12 IST2021-02-14T04:12:41+5:302021-02-14T04:12:41+5:30
अमरावती : राजापेठ पोलिसानी तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. गजानन महादेव लांडगे ...

अस्तित्व लपवून फिरणारा अटकेत
अमरावती : राजापेठ पोलिसानी तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. गजानन महादेव लांडगे (२२, रा. औरंगपुरा), शंकर चांदणे, भारत दिवटे (दोन्ही रा. माताखिडकी) असे आरोपीचे नाव आहे. यापैकी एकाकडे लोखंड कापण्याची आरी आढळून आली. ती पोलिसानी जप्त केली. पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.
-----------------------------------------------------
भोवळ आल्याने इसमाचा मृत्यू
अमरावती : भोवळ आल्याने कोसळलेल्या इसमाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. देविदास रामकृष्ण खडसे ( ६०, रा. जेल क्वार्टर ) असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अकास्मिक मृत्यूची नोंद केली.
--------------------------------------
इसमाचा मृत्यू
अमरावती : एका इसमाला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी घडली. चिरंजीलाल दल्लू धोेटे (६६, रा. रेडवा चिचकुंभ, ता. चांदूर बाजार) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.