स्फोटक पदार्थ विक्री करणाऱ्याला अटक
By Admin | Updated: October 12, 2015 00:26 IST2015-10-12T00:26:02+5:302015-10-12T00:26:02+5:30
कॅल्शिअम कार्बाईड या ज्वलनशील पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली.

स्फोटक पदार्थ विक्री करणाऱ्याला अटक
खळबळ : नागपुरी गेट पोलिसांची कारवाई
अमरावती : कॅल्शिअम कार्बाईड या ज्वलनशील पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. राजेश सामनदास शादी (४२, रा. बालाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ३ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांचे पथक शनिवारी गस्तीवर असताना त्यांना इतवारा बाजारातील सिंधी किराणा लाईनमधील राजेश हार्डवेअर अॅन्ड मार्केटिंग या प्रतिष्ठानात कल्शिअम कार्बाईडची विक्री होत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी संचालक राजेश शादी यांना विचारपूस केली असता विनापरवाना या ज्वलनशिल पदार्थाची विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी राजेश शादीला अटक करून ३४ गॅ्रम कल्शिअम कार्बाईडसह ४५ किलो माल जप्त केला. नागपुरी गेट पोलिसांनी आरोपीविरुध्द कलम २८५, २८६ (ज्वलनशील पदार्थाबाबत हयगय करून ते बाळगणे) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. कॅल्शिअम कार्बाईडची विक्री करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, आरोपी विनापरवानगी विक्री करताना पोलिसांना आढळून आला आहे. अमरावती शहरात अशाप्रकारची पहिलीच कारवाई पोलिसांनी केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.