गौतम हिरेन प्रकरणातील आरोपींना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST2021-03-13T04:23:10+5:302021-03-13T04:23:10+5:30

जिल्हाधिकाऱ्यांना जैन सेलचे निवेदन अमरावती : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरेन यांचे हत्याप्रकरण ...

Arrest the accused in the Gautam Hiren case | गौतम हिरेन प्रकरणातील आरोपींना अटक करा

गौतम हिरेन प्रकरणातील आरोपींना अटक करा

जिल्हाधिकाऱ्यांना जैन सेलचे निवेदन

अमरावती : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरेन यांचे हत्याप्रकरण व ठाण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या अवेळी मृत्यूचे पडसाद अमरावतीतही उमटले आहे. भाजपच्या जैन सेलने बुधवारी जिल्हाधिऱ्यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील निवेदन सादर केले. दोन्ही प्रकरणांतील दोषींना तत्काळ अटक करा व जैन समाजाला न्याय द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ठाण्यातील व्यवसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळून आला होता. गौतम हिरेन यांचे प्रारंभी अपहरण केले गेले. काही दिवसांनंतर त्यांचे प्रेतच नातलगांच्या हाती लागले. या दोन्ही प्रकरणांमुळे जैन समाजाला जबर धक्का बसला आहे. पोलिसांची निष्क्रियता यात प्रकट झाली आहे. राज्याच्या विधिमंडळातही यावर जोरदार चर्चा व आरोप-प्रत्यारोप झाले. परंतु, अद्याप दोनपैकी एकाही कुटुंबाला मृत्यूचे ठोस कारण कळले नाही. त्यामुळे शासनाने अपहरणकर्ते व खुनी यांचा तपास करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी केली आहे. निवेदन देतेवळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किरण पातूरकर व भाजप अल्पसंख्याक आघाडीतील जैन सेलचे अध्यक्ष सजल जैन यांच्या नेतृत्वात जैन समाजाचे निवडक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Arrest the accused in the Gautam Hiren case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.