अचलपूरमध्ये सैन्यदलाची जमीन खासगी व्यक्तीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST2021-02-12T04:12:51+5:302021-02-12T04:12:51+5:30
परतवाडा : अचलपूरमध्ये महसूल विभागाने सैन्यदलाची (डिफेन्स लँड) जमीन चक्क एका खासगी व्यक्तीला दिली आहे. यात अचलपूर तहसीलदारांचा ...

अचलपूरमध्ये सैन्यदलाची जमीन खासगी व्यक्तीला!
परतवाडा : अचलपूरमध्ये महसूल विभागाने सैन्यदलाची (डिफेन्स लँड) जमीन चक्क एका खासगी व्यक्तीला दिली आहे. यात अचलपूर तहसीलदारांचा स्वयंस्पष्ट अहवाल उपविभागीय अधिकाºयांसह जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित केला गेला.
अचलपूर सर्किट हाऊसलगत परतवाडा गट क्र.२५, क्षेत्र ३.९९ हेक्टर जमीन सैन्य दलाची मालकीची आहे. डिफेन्स इस्टेट ऑफिसर, सिकंदराबाद, आंधप्रदेश यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना पाठविलेल्या ५ डिसेंबर २०१८ च्या पत्रात हे स्पष्ट केले आहे. परतवाड्याच्या या पत्राच्या अनुषंगाने सर्व्हे क्रमांक ०४, ५/१, ११, १३, १४, १५, १६, १८, १९, २५, २६, ३४, ३७, ३८, ३९ मिळून ४०२.०८३ एकर जमिन ही मिल्ट्रीची आहे. यासोबतच ईलीचपूर तालुक्यातील हिवरा गावातील सर्व्हे क्रमांक ४ मधील २९.९७५ एकर जमीन सुद्धा सैन्यदलाची आहे. या जमिनींसह अमरावती जिल्ह्यात आजही एकूण ४७८.८६६ एकर जमीन सैन्यदलाची आहे. याच्या नोंदी, माहिती रक्षा संपदा अधिकारी कार्यालय, सिकंदराबाद (आंध्रप्रदेश) यांच्याकडे आहे. अचलपूर-परतवाड्यासह जिल्ह्यातील सैन्यदलाच्या या ४७८.८६६ एकर जमिनीची माहिती ५ डिसेंबर २०१८ च्या पत्राद्वारे त्यांनी अमरावती जिल्हाधिकाºयांना कळविली आहे.
परतवाडा येथील या सर्वे क्र. २५ मधील ३.९९ हेक्टर क्षेत्र जमीन वनविभााच्या शासकीय लाकुड डेपोकडे शासकीय लाकुड ठेवण्याकरिता ७५ वर्षांपासून ताब्यात आहे. ही सैन्यदलाची जमीन असतानाही या ३ हेक्टर क्षेत्र जमीनीपैकी १ हेक्टर जमीन महसूल विभागाने वनविभागाकडून हिसकावून घेतली. या जमिनीच्या अनुषंगाने अचलपूर तहसीलदारांनी अचलपूर एसडीओंकडे २१ डिसेंबर २०१८ ला पाठविलेला स्वयंस्पष्ट अहवाल तत्कालीन एसडीओंनी बघितला नाही. तत्कालीन जिल्हाधिकाºयांनीही याबाबी विचारात न घेता १ हेक्टर मिल्ट्रीची जमीन गोपाल येवले (रा.वडगाव फत्तेपूर) या खाजगी व्यक्तीस देण्यास १४ नोव्हेंबर २०१८ ला आदेशीत केले. आदेशित करताना संपूर्ण प्रकरण अचलपूर एसडीओंवर ढकलल्या गेले.
दबावतंत्राचा वापर
ही जमीन त्या खाजगी व्यक्तीला देतांना मुंबईस्थित तत्कालीन एका ज्येष्ठ आयएएस अधिकाºयाचा दबाव कारणीभूत ठरला. अखेर सर्व माहिती असूनही अचलपूर एसडीओंनी एक शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर गोपाल येवले यांच्याकडून ६ मार्च २०१९ ला प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. ही जमीन सैन्यदलाची असल्याचे आढळून आल्यास ती जमीन शासनास परत करण्याची कबूली त्या प्रतिज्ञापत्रात गोपाल येवले यांनी अचलपूर एसडीओंना दिली. तर एसडीओंनी ती एक हेक्टर जमीन येवले यांना देवून टाकली.
कोट यायचा आहे.