सैन्यदिनी ‘वॉर ट्रॉफी’ची सजावट
By Admin | Updated: January 16, 2017 00:18 IST2017-01-16T00:18:58+5:302017-01-16T00:18:58+5:30
शहरात प्रथमच रविवारी भारतीय थलसेना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

सैन्यदिनी ‘वॉर ट्रॉफी’ची सजावट
एनसीसी सदस्यांचा पुढाकर : माजी सैन्य अधिकाऱ्यांचा सहभाग
अमरावती : शहरात प्रथमच रविवारी भारतीय थलसेना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ६९ व्या भारतीय सेना दिवसाच्यानिमित्ताने एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी अमरावतीकरांना भेट म्हणून दिलेल्या ‘वॉर ट्रॉफी’ची सजावट करून सैन्यातील माजी अधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते.
यावेळी महापालिका आयुक्त हेमंत पवार अध्यक्षस्थानी होते, तर थलसेनेतील माजी अधिकारी बहाळे, सुभेदार सोनोने, नायक सुधीर चक्रे आदी उपस्थित होते. यावेळी एनसीसीचे माजी विद्यार्थी भूपेंद्र रंगवाला, शुभम् भालकर, सूरज भदोरिया, संचित गणवीर, मयूर अंबुलकर, शुभम् बावनेर, अखिलेश बरणे, श्याम प्रांजळे, कुणाल भेले, संकेत कदम, आदित्य वानखडे, प्रवीण देशमुख, अक्षय जाधव, गौरव तायवाडे, धीरज बांबल, अक्षय धीवर, नीलेश बुंदेले, तेजस खरबकर, प्रताप मोहोड, शुभम् ढोले आदींची उपस्थिती होती. शहरात पहिल्यांदाच हा कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)