रामनवमी शोभायात्रेत शस्त्रप्रदर्शन
By Admin | Updated: April 6, 2017 00:09 IST2017-04-06T00:09:47+5:302017-04-06T00:09:47+5:30
शहरात रामनवमीनिमित्त मंगळवारी निघालेल्या भव्यदिव्य रॅलीत सहभागी झालेल्या काही तरूणांनी चक्क ‘शस्त्रप्रदर्शन’ केल्याने खळबळ उडाली होती.

रामनवमी शोभायात्रेत शस्त्रप्रदर्शन
१८ तलवारींसह मुठी, म्यान जप्त : राजापेठ पोलिसांची कारवाई
अमरावती : शहरात रामनवमीनिमित्त मंगळवारी निघालेल्या भव्यदिव्य रॅलीत सहभागी झालेल्या काही तरूणांनी चक्क ‘शस्त्रप्रदर्शन’ केल्याने खळबळ उडाली होती. हा प्रकार राजापेठ पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या तरूणाजवळून तब्बल १८ तलवारींसह मुठी आणि म्यान जप्त केल्यात.
विश्व हिन्दू परिषद व बजरंग दलतर्फे मंगळवारी सायंकाळी रामनवमीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध देखावे, झांक्या, लेझिम पथक, ढोलताशा पथक, डिजे आदींचा शोभायात्रेत समावेश होता. बालाजी प्लॉट येथून निघालेल्या या शोभायात्रेत हजारो भक्तांनी गर्दी केली होती.
शस्त्रप्रदर्शन कशासाठी ?
अमरावती : शोभायात्रा राजापेठ ते राजमकल चौकादरम्यान असताना संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, शोभायात्रेत सहभागी काही तरूणांनी शस्त्रप्रदर्शन करण्याच्या उद्देशाने चक्क हातात तलवारी काढल्यात आणि डिजे व ढोलताशांच्या गजरात या तलवारी फिरविण्यास सुरूवात केली. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या तरुणांजवळून तलवारी ताब्यात घेतल्या. तब्बल १८ जणांजवळ लोखंडी व स्टिलच्या तलवारी आढळून आल्यात. यासर्व तलवारी पोलिसांनी जप्त करून २५ जणांविरूद्ध ४/२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
१० ते १५ जणांविरूद्ध गुन्हे
राजापेठचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी बजरंग दलचे कार्यकर्ते व शोभायात्रेचे आयोजक निरंजन दुबे यांच्यासह अंकुश राजेंद्र वानखडे (रा.भाजीबाजार), अक्षय गोपी बुंदेले (रा.मुधोळकर पेठ), शिवलिंग सुभाष गरड (रा.अंबापेठ), मोटू प्रकाश वाटकर (रा.महाजनपुरा), संदीप राजेश वर्मा (रा.रविनगर), आकाश महादेव ठाकूर (रा.राजापेठ), सतीश मदनलाल राकेश, संभाजी वसंत मोहोड, शंकर श्रीकिसन हरणे, विजय ओझा (सर्व रा.बेलपुरा) यांच्यासह १० ते १५ कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.