अऱ्हाड, कुऱ्हाड रोपवनात हिरवळ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:28+5:30
वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात पोहरा वनपाल पी.व्ही. वानखडे यांच्या नेतृत्वात वनरक्षक जगदीश गोरले यांनी या रोपवनात झाडे वाचविण्यासाठी ३३ कोटी वृक्षलागवडी अंतर्गत लावलेल्या पोहरा वनवर्तुळातील उदखेड बीटमधील अऱ्हाड, कुऱ्हाड रोपवनाचे नियोजनही काळजीपूर्वक केल्याचे दिसून आले आहे.

अऱ्हाड, कुऱ्हाड रोपवनात हिरवळ फुलली
अमोल कोहळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा (बंदी) : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा वर्तुळाच्या उदखेड बीटमधील अºहाड, कुऱ्हाड वनखंड क्रमांक ५३ मध्ये नुकत्याच झालेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीतील रोपवनातील अनेक प्रजातीची २७ हजार ७७५ रोपे तीन ते चार फुटांपर्यंत वाढल्याचे दिसून येत आहेत.
वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात पोहरा वनपाल पी.व्ही. वानखडे यांच्या नेतृत्वात वनरक्षक जगदीश गोरले यांनी या रोपवनात झाडे वाचविण्यासाठी ३३ कोटी वृक्षलागवडी अंतर्गत लावलेल्या पोहरा वनवर्तुळातील उदखेड बीटमधील अऱ्हाड, कुऱ्हाड रोपवनाचे नियोजनही काळजीपूर्वक केल्याचे दिसून आले आहे.
वृक्षलागवडीच्या योग्य संगोपनासोबतच पाणी, खत, फवारणी याचाही योग्य पद्धतीने वापर करण्यात आला. यातील सर्व झाडे निरोगी आहेत. सध्या या रोपवनात विविध प्रजातींची दर्जेदार झाडे पहावयास मिळतात. ९५ हेक्टर वृक्षलागवड केलेला परिसर खडकाळ असून, या रोपवनात संपूर्ण रोपे रांगेत डोलात उभी आहेत. अऱ्हाड, कुऱ्हाड हे रोपवन १०० टक्के यशस्वी ठरले आहे. या रोपवनामध्ये हिवाळ्यात टँकरद्वारे स्वत: प्रत्यके वृक्षाला पाणी देण्याचे कार्य वनरक्षक जगदीश गोरले करीत आहे.
झाडे वाचविण्याची धडपड
२५ हेक्टरमधील वृक्ष वाचविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या रोपवनामध्ये अनेक प्रजातीच्या वृक्षामध्ये सागवान, पापळा, करंज, खैर, माहारुख, चिंच, अमलतास, बांबू, कवठ, पिंपळ, चिंच, कडूनिंब, आवळा, हिवर अशा प्रकारची वृक्षांची लागवड केली असून या वृक्षाला वाचविण्यासाठी नियमित उखरी, निंदनी, पाणी, खत वृक्षारोवती साफसफाई करून ७५ हेक्टर मधील चारही बाजूने चेनलिंग फेन्सिंग उभारण्यात आले.