युक्तिवाद झाला; फैसला आज
By Admin | Updated: February 20, 2015 00:08 IST2015-02-20T00:08:14+5:302015-02-20T00:08:14+5:30
महापालिकेत गत वर्षांपासून सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतापदाच्या वादावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला आहे.

युक्तिवाद झाला; फैसला आज
अमरावती : महापालिकेत गत वर्षांपासून सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतापदाच्या वादावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला आहे. शुक्रवारी या वादावर फैसला होणार असून गटनेता अविनाश मार्डीकर की, सुनील काळे? हे स्पष्ट होईल. या निकालावर दोघांचेही राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
विभागीय आयुक्त, उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता पदाचा सुरु आहे. ही राजकीय लढाई संजय खोडकेविरुद्ध आ. रवी राणा अशी असून मार्डीकर व काळे हे नाममात्र आहेत. परंतु महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता पदावर बरेच काही अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनील काळे यांच्या बाजूने निकाल दिल्यास महापौरपदाची झालेली निवडणूक बाधित होऊन ती नव्याने घेण्याबाबतच्या हालचाल सुरु होती.