पंचवटीत तरूणांचा हैदोस, चाकुही उगारला; चौघांवर गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: December 31, 2023 16:12 IST2023-12-31T16:12:40+5:302023-12-31T16:12:44+5:30

फिर्यादी वेदान याला ३० डिसेंबर रोजी आरोपीचा फोन आला. त्याने फिर्यादीस फोनवर जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली.

Argument between 2 groups in Amravati, youths pulled out knives, police registered a case | पंचवटीत तरूणांचा हैदोस, चाकुही उगारला; चौघांवर गुन्हा दाखल

पंचवटीत तरूणांचा हैदोस, चाकुही उगारला; चौघांवर गुन्हा दाखल

अमरावती: आधी झालेले भांडण मिटविण्यासाठी बोलावलेल्या तरूणावर चाकू उगारून सहा तरूणांनी येथील पंचवटीस्थित एका हॉटेलसमोर यथेच्छ धुडगुस घातला. ३० डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास ती घटना घडली. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी वेदान गजानन वांदळे (२४, अमरावती) याच्या तक्रारीवरून अनिकेत खंडारे, वेदांत रंगारी व त्याच्या चार सहकाऱ्यांविरोधात रात्री फौजदारी गुन्हे दाखल केले.

फिर्यादी वेदान याला ३० डिसेंबर रोजी आरोपीचा फोन आला. त्याने फिर्यादीस फोनवर जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. प्रत्युत्तरात फिर्यादीने देखील आरोपीस शिवीगाळ केली. तथा फोन कट केला. दरम्यान पुन्हा आरोपी अनिकेतने वेदानला फोन कॉल केला. तू पंचवटीवर ये, आपण भांडण मिटवून टाकू, अशी बतावणी त्याने केली. त्यामुळे वेदान दुपारी एकच्या सुमारास पंचवटीतील एका हाॅटेलसमोर पोहोचला. तेथे अनिकेत व वेदांत रंगारी यांच्यासह त्याचे चार मित्र देखील होते. तेथे अनिकेतने फिर्यादीस शिवीगाळ केली. वेदांत रंगारी याने अनिकेतच्या हाती चाकू देत ‘मार साले को’ असे म्हटले. त्याने चाकू मारला देखील. मात्र फिर्यादी तरूण बाजुला सरकल्याने त्यास चाकु लागला नाही. तो धुडगुस पाहून तेथे गर्दी जमली. त्यामुळे आरोपी वाहनाने पळून गेले. तर फिर्यादी वेदान वांदळे याने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले.

Web Title: Argument between 2 groups in Amravati, youths pulled out knives, police registered a case