विमा भरपाईसाठी प्रहारचे अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:56 IST2018-07-20T22:55:44+5:302018-07-20T22:56:04+5:30
अद्याप अनेक शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यांना देण्यात आलेली भरपाई तांत्रिक कारणामुळे रिलायन्स कंपनीला परत गेली. ही भरपाई त्वरित मिळावी, यासाठी प्रहारद्वारा मार्च महिन्यात निवेदन देण्यात आले.

विमा भरपाईसाठी प्रहारचे अर्धनग्न आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अद्याप अनेक शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यांना देण्यात आलेली भरपाई तांत्रिक कारणामुळे रिलायन्स कंपनीला परत गेली. ही भरपाई त्वरित मिळावी, यासाठी प्रहारद्वारा मार्च महिन्यात निवेदन देण्यात आले. मात्र, याकडे कृषी अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसह शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या देत अर्र्धनग्न आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली.
जिल्ह्यातील ४५ हजार शेतकरी विमा भरपाईसाठी पात्र ठरले व त्यांना ६४ कोटींची भरपार्ई बँक खात्यात जमा केल्याचे सांगण्यात आले. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रिलायन्स कंपनीद्वारा आरटीजीएसद्वारे भरपाई जमा करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांना खात्यामध्ये ही भरपाई जमाच झाली नसल्याचे दिसून आले. परत गेलेली रक्कम शेतकऱ्यांना पुन्हा मिळावी, यासाठी कृषी विभागाने आश्वासन दिले. प्रत्यक्षात कुठलेच प्रयत्न केले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे प्रहार पदाधिकाºयांनी शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या दिला. यावेळी कृषी संचालक अनिल खर्चान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही भरपाई शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.