मनमानी पार्किंगचे संकट

By Admin | Updated: July 18, 2016 01:15 IST2016-07-18T01:15:05+5:302016-07-18T01:15:05+5:30

शहरातील गृहसंकुले, मॉल, वाणिज्य केंद्र आणि रस्त्यांवर मनमानी पद्धतीने वाहनांचे पार्किंग केले जात आहे.

Arbitrary parking crisis | मनमानी पार्किंगचे संकट

मनमानी पार्किंगचे संकट

हॉटेल, संकुलधारकांची मुजोरी : कारवाईचा दणका हवा
अमरावती : शहरातील गृहसंकुले, मॉल, वाणिज्य केंद्र आणि रस्त्यांवर मनमानी पद्धतीने वाहनांचे पार्किंग केले जात आहे. एखादी दुर्घटना घडली तर अग्निशमनदलाची मदत घटनास्थळी पोहोचतांना अनंत अडधळे उभे ठाकतील,असे बहुतांश ठिकाणचे चित्र आहे. जवाहरगेट आणि मोची गल्ली या मनमानी पार्किंगचे प्रतिनिधीक उदाहरण आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी तत्कालीन उपायुक्त नितीन पवार यांनी ट्रॅफिक स्टेटस् रिपोर्ट बनविला होता. या सर्व्हेक्षणादरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेतील असंख्य त्रुटी समोर आल्या आहेत. शहरातील ९९ टक्के गृहसंकुले, मॉल्स, आणि व्यावसायिक संकुलांनी पार्किंगच्या जागा गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे पार्किंगच्या जागेव्यतिरिक्त ओपन स्पेसमध्ये वाहनाचे पार्किंग केले जाते. वाहनांमुळे आत जाण्याचे आणि बाहरे पडण्याचे मार्ग अरुंद होतात. तेथून आपत्कालिन परिस्थितीत अग्निशमनदलाच्या वाहनांचे मार्गक्रमण शक्य नसल्याचा प्रत्यय मोची गल्ली, जवाहर गेट, सक्करसाथ, तखतमल इस्टेट, नमुनागल्ली (चून्नू मून्नू), इतवाऱ्यातील बहुतांश गल्ल्या, हमालपुरा रोड, या भागातील अस्ताव्यस्त पार्किंग व्यवस्था पाहिल्यानंतर येतो. शहरातील अनेक रस्त्यांवर मनमानी पार्किंग होत असल्याने वाहनांची कोंडी होत असल्याचा निष्कर्ष पवार यांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून काढण्यात आला होता.

 

Web Title: Arbitrary parking crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.