प्रहारच्या आंदोलनानंतर एसटीचे प्रशिक्षित चालक, वाहकांना नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST2021-09-21T04:14:35+5:302021-09-21T04:14:35+5:30

(फोटो आहेत) अमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन २०१९ मध्ये अमरावती विभागात सरळसेवा भरतीनंतरही चालक, वाहकांचे प्रशिक्षण ...

Appointment of trained drivers, carriers of ST after strike agitation | प्रहारच्या आंदोलनानंतर एसटीचे प्रशिक्षित चालक, वाहकांना नियुक्ती

प्रहारच्या आंदोलनानंतर एसटीचे प्रशिक्षित चालक, वाहकांना नियुक्ती

(फोटो आहेत)

अमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन २०१९ मध्ये अमरावती विभागात सरळसेवा भरतीनंतरही चालक, वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊनही नियुक्ती दिली नव्हती. हा मुद्दा प्रहार संघटनेने लावून धरला. न्याय मागण्या पूर्ण होण्यासाठी उपोषण केले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुढाकार घेत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. अखेर एसटीचे प्रशिक्षण झालेल्या चालक, वाहकांना नियुक्ती देण्याचा निर्णय झाला.

एमईओ चालक चाचणी पूर्ण न केल्याबाबत एसटी प्रशासनाला प्रहार शहरप्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात १४ सप्टेंबर रोजी या विषयाला अनुसरून अन्नत्याग आंदोलन करण्याबाबतचा इशारा दिला होता. मात्र, विभागीय परिवहन विभागाने प्रशिक्षण पूर्ण झालेले सरळसेवेत समाविष्ट न केलेल्या पात्र उमेदवारांना सोबत घेऊन या न्याय्य मागणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण सुरू केले होते. १४ ते १९ सप्टेंबर या दरम्यान उपोषण सुरू असताना प्रहार कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली होती. यादरम्यान उपोषण चिघळण्याची स्थिती निर्माण होताच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन परिवहन विभागाच्या मुंबई स्थित मध्यवर्ती कार्यालयाशी तात्काळ संवाद साधला व संबंधित उपोषणकर्ते पात्र उमेदवारांना नियमानुसार सरळसेवेत रुजू करून घेण्याचे निर्देशित केले. त्याअनुषंगाने अमरावती राज्य परिवहन विभाग नियंत्रकांनी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केली. ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत रिक्त जागांनुसार सरळ सेवा भरती २०१९ अंतर्गत निवड झालेल्या चालक तथा वाहकपदाच्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल, असे लेखी आश्वासनपत्र देण्यात आले. यावेळी उपोषणकर्ते विशाल रौराळे, शैलेश थोरात, राहुल उकर्डे, अमोल जुमळे, सतीश खंडाळकर, दिगांबर व्यवहारे तसेच प्रहार शहरप्रमुख बंटी रामटेके, शहर संपर्कप्रमुख गोलू पाटील, जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, उपशहरप्रमुख शाम इंगळे, रावसाहेब गोंडाणे, अभिजित गोंडाणे ,विक्रांत जाधव, शेषराव धुळे आदी प्रहार कार्यकर्ते होते.

Web Title: Appointment of trained drivers, carriers of ST after strike agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.