विषय समित्यांवर सदस्यांची नियुक्ती

By Admin | Updated: April 22, 2015 23:54 IST2015-04-22T23:54:24+5:302015-04-22T23:54:24+5:30

महापालिकेत चार विषय समित्यांवर सदस्यपदांसाठी सोमवारी झालेल्या आमसभेत पक्षीय बलानुसार नियुक्ती करण्यात आली.

The appointment of members on Subject Committees | विषय समित्यांवर सदस्यांची नियुक्ती

विषय समित्यांवर सदस्यांची नियुक्ती

महापौरांची घोषणा : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात राहतील समिती
अमरावती : महापालिकेत चार विषय समित्यांवर सदस्यपदांसाठी सोमवारी झालेल्या आमसभेत पक्षीय बलानुसार नियुक्ती करण्यात आली. महापौर चरणजितकौर नंदा यांनी नवनियुक्त सदस्यांच्या नावांची घोषणा केली.
विधी समितीत काँग्रेसचे भारत चव्हाण, अरुण जयस्वाल, सुनीता भेले तर राष्ट्रवादी फ्रंटच्या शमीमबानो सादिक आयडिया, भूषण बनसोड, जनविकास- रिपाइं फ्रंटच्या अंजली पांडे, शिवसेनेचे राजू मानकर, भाजपचे चंदूमल बिल्दानी, बसपाच्या अल्का सरदार यांची नियुक्ती करण्यात आली. शहर सुधार समितीत काँग्रेसच्या मालती दाभाडे, कांचन ग्रेसपुंजे, प्रदीप हिवसे तर राष्ट्रवादी फ्रंटचे भूषण बनसोड, वंदना हरणे, जनविकास- रिपाइं फ्रंटचे नितीन देशमुख, सेनेच्या सुर्वणा राऊत, भाजपच्या छाया अंबाडकर, बसपाच्या निर्मला बोरकर यांची निवड करण्यात आली. शाळा सुधार समितीत काँग्रेसचे राजेंद्र महल्ले, अ. रफिक, नूरखाँ मौजदारखाँ, राष्ट्रवादी फ्रंटचे मो. इमरान, ममता आवारे, जनविकास- रिपाइंचे राजू मसराम, शिवसेनेच्या रेखा तायवाडे, भाजपच्या हेमलता साहू, बसपाचे दीपक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. महिला व बाल कल्याण समितीत काँग्रेसच्या संगीता वाघ, अर्चना राजगुरे, अर्चना इंगोले तर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या सारिका महल्ले, जयश्री मोरे जनविकास - रिपाइंच्या सुजाता झाडे, सेनेच्या स्वाती निस्ताने, भाजपच्या कांचन उपाध्याय तर बसपाच्या अलका सरदार यांची निवड झाली. प्रामुख्याने शाळा सुधार समितीचे सभापती अ. रफिक तर महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी संगीता वाघ यांच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी फ्रंटने विधी समिती सभापतीपदी शमीमबानो सादिक आयडिया तर शहर सुधार समिती सभापतीपदी भूषण बनसोड यांची नावे निश्चित केल्याची विश्वसनीय माहिती आहे.
सभापतीपदाच्या निवडणुकांना अवधी असला तरी काँग्रेस व राष्ट्रवादी फ्रंटमध्ये सत्तावाटपाचे सूत्र ठरले असून त्यानुसार पदे दिली जाणार आहेत.

हे आहेत
संभाव्य सभापती!
शाळा सुधार समिती-
अ. रफिक (काँग्रेस)
महिला व बाल कल्याण- संगीता वाघ ( काँग्रेस)
शहर सुधार समिती -
भूषण बनसोड ( राष्ट्रवादी फ्रंट)
शमीमबानो सादीक आयडीया
( राष्ट्रवादी फ्रंट)

Web Title: The appointment of members on Subject Committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.