रेड्डीला सहआरोपी, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:13 IST2021-03-31T04:13:26+5:302021-03-31T04:13:26+5:30
परतवाडा : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करून श्रीनिवास रेड्डी यांना सहआरोपी करून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात ...

रेड्डीला सहआरोपी, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा
परतवाडा : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करून श्रीनिवास रेड्डी यांना सहआरोपी करून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे, त्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्जल निकम यांची नियुक्ती करावी, विशाखा समिती स्थापन न केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशा विविध मागण्यांचे पत्र औरंगाबाद फॉरेस्ट रेंजर असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आले. या मागण्यांवर कार्यवाही न केल्यास २ एप्रिलपासून ‘काम बंद’चा इशारा यातून देण्यात आला आहे.
विनोद शिवकुमारला बडतर्फ करावे. श्रीनिवास रेड्डी यांना सहआरोपी करून तात्काळ अटक करून निलंबित व
बडतर्फ करण्यात याचे. विनोद शिवकुमारविद्ध दाखल गुन्ह्यात ३०२, ३५४ अ, ३७६ या कलमांचा यांचा समावेश करून खटला चालविण्यात यावा. वरिष्ठ आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्यात यावी. दीपाली चव्हाण यांना मरणोपरांत तरी जलद न्याय मिळून देण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे व त्याकरिता उज्ज्वल निकम किंवा अन्य विशेष सरकारी अभियोक्ता यांची नियुक्ती करण्यात यावी. दीपाली चव्हाण यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे त्यांचे अकारण रोखलेले सर्व वेतन व मृत्यूनंतरचे सर्व लाभ त्यांच्या आईस देण्यात यावे. त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून विशेष बाब म्हणून ५० लक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात यावे. अॅट्रासिटी प्रकरणातील फिर्यादी मनीषा उईके यांच्यावर कारवाई करावी, असेही औरंगाबाद वनवृत्ताच्या फॉरेस्ट रेंजर असोसिएशनचे अध्यक्ष ए.बी. गायके, उपाध्यक्ष सचिव आदींनी म्हटले आहे.
------------------