‘आॅनलाईन’ भरावे लागणार उमेदवारी अर्ज
By Admin | Updated: February 25, 2015 00:32 IST2015-02-25T00:32:48+5:302015-02-25T00:32:48+5:30
मे आणि आॅगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी २६ फेब्रुवारी रोजी पहिली प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

‘आॅनलाईन’ भरावे लागणार उमेदवारी अर्ज
नरेंद्र जावरे अचलपूर
मे आणि आॅगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी २६ फेब्रुवारी रोजी पहिली प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या ३९८ जागांसाठी १८५ केंद्रावरुन निवडणूक घेतली जाणार आहे. पहिल्यांदा उमेदवारीला नामांकन अर्ज व खर्चाची नोंद आॅनलाईन भरुन द्यावी लागणार असून तशी तयारी प्रशासनातर्फे सुरू आहे.
अचलपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या संपूर्ण ३९२ व पाच ग्रामपंचायतीच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. ९ मार्च पर्यंत त्यावर हरकती बोलाविण्यात येतील व १४ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केल्या जाणार आहे. नावात बदल, विधानसभा निवडणूक यादीत नाव असणे किंवन गहाळ होणे, दोन वार्डात नाव अशा तीन प्रकारच्या तक्रारींचा निपटारा या कालावधीत केला जाईल. त्यासाठी ग्रामीण मतदारांनी आपल्या हरकती वेळेत दाखल करण्याचे आवाहन तहसीलदार मनोज लोणारकर यांनी केले आहे.
लोकप्रतिनिधींसाठी प्रतिष्ठेची
अचलपूर तालुक्यातील ४७ ग्रामपंचायती अचलपूर, मेळघाट व दर्यापूर मतदार संघात येत असल्याने तिन्ही आमदारांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. अचलपूर मतदार संघातील ११, दर्यापूरातील ९ तर सर्वाधिक मेळघाट मतदार संघात येणाऱ्या अचलपूर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या सर्व जागांसाठी पोट निवडणूक होणार आहे. आ. बच्चू कडू, आ. रमेश बुंदिले व आ. प्रभुदास भिलावेकर यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आ. केवलराम काळे आदी नेते नागरिकांच्या सतत संपर्कात आहे. निवडणुकीच्या तयारीची धूम सुरु आहे.
पाच ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक
नारायणपूर, सालेपूर, कोल्हा, शिंदी बु. हरम, वडगाव फत्तेपूर, मल्हारा, रासेगाव, बोर्डी, परसापूर, टवलार, हनवतखेडा, गौरखेडा, बोवापूर, नायगाव, खाजमातगर, इसापूर, एकलासपूर, कांडली, खैरी, कोष्ठा बु., धोतरखेडा, येवता, दर्याबाद, येसूर्णा, बोरगाव दोरी, थुगाव, घोडगाव, चौसाळा, सावळापूर, निजामपूर, बोरगाव पेठ, अंबाडा कंठरी, निमकुुंठ, निंभारी, पथ्रोट, धामणगाव गढी, कुष्ठा खुर्द, वडनेर भुजंग, वझ्झर, पांढरी, कविठा बु. येथे सर्व जागांसाठी तर निमदरी, बेलखेडा , कासमपूर, पिंपळखुटा, भिलोना या पाच ग्रामपंचायतींच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.