पाच लाखांची लाच मागणारा ‘एपीआय’ जेरबंद

By Admin | Updated: December 15, 2015 00:10 IST2015-12-15T00:10:50+5:302015-12-15T00:10:50+5:30

मोर्शी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयातील अपहाराची चौकशी करीत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकासह एका जमादाराला अटक करण्यात आली आहे.

'API' for a bribe of five lakh bribe | पाच लाखांची लाच मागणारा ‘एपीआय’ जेरबंद

पाच लाखांची लाच मागणारा ‘एपीआय’ जेरबंद

जमादारही अडकला : अटक टाळण्यासाठी केली मागणी
अमरावती : मोर्शी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयातील अपहाराची चौकशी करीत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकासह एका जमादाराला अटक करण्यात आली आहे. संबंधित तक्रारदाराला अटक न करण्याकरिता या सहायक पोलीस निरीक्षकाने ५ लाख रूपयांची लाच मागितली. सापळ्यादरम्यान हे सिद्ध झाल्याने दोन्ही पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याला अटक केली. मोर्शी येथील एकात्मिक बालविकास कार्यालयात १३ डिसेंबरला कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोर्शी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक संदेश पालांडे (३४, मोर्शी) व पोहेकाँ शामसिंग नारायणसिंग चुंगडा (३९, मोर्शी) यांचा समावेश आहे. मोर्शी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक लाभ, मानधन, व इतर कारभारात आर्थिक अनियमितता केल्याने मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदेश पालांडे यांच्याकडे सोपविला. या गुन्ह्यात तक्रारकर्तासुद्धा आरोपी आहे. याच गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पालांडे हे ५ लाखांची लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. सापळ्यादरम्यान पालांडे व जमादार शामसिंग चुंगडा यांनी या तक्रारदाराला ५ लाखांची मागणी केली. या प्रकरणात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती एसीबीचे पोलीस निरीक्षक उराडे यांनी दिली. सपोनि पालांडे आणि शामसिंग चुंगडा या दोघांनाही अटक केली. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातील अपहारप्रकरणी जानेवारी २०१५ मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Web Title: 'API' for a bribe of five lakh bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.