शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील विद्यार्थ्यांच्या बनणार 'अपार आयडी'; शैक्षणिक कुंडली क्लिकवर मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:07 IST

डिजिटल माहिती उपलब्ध होणार : विद्यार्थ्यांसाठी आता 'अपार' आयडी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आधार कार्डप्रमाणेच विद्यार्थ्यांची स्वतंत्र शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठविण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक विद्यार्थ्यांचा 'अपार' (ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक रजिस्ट्री) नंबर तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावी, तसेच पाहिजे तेव्हा ती ऑनलाइन स्वरूपात बघता यावी, यासाठी केंद्रीयशिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 'वन नेशन वन स्टुडंट' आयडीच्या धर्तीवर आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा इयत्ता नववीपासून अपार नंबर तयार करण्यात येणार आहे. यामुळे नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती उपलब्ध होणार आहे. हा नंबर डिजीलॉकरलाही जोडण्यात येणार आहे. पुढील एक महिन्यात यावर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य प्रकल्प संचालकांकडून जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. 'अपार' मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा जिल्हा आणि राज्यामध्ये ऑनलाइन पाठवणे सुलभ होईल. विद्यार्थ्यांचे 'अपार' आयडी विद्या समीक्षा केंद्रांना जोडण्यात येऊन त्या माहितीचे ग्राफिकल अॅनालिसिस करण्यात येईल. 'यू' डायस प्लस प्रणालीच्या ज्या विद्यार्थ्यांचे आधार वैध असेल, त्यांचेच अपार आयडी तयार होतील. अपारमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा शोध, गळतीचे प्रमाण घटविण्यास मदत करणे आदी बाबी नियंत्रित करण्यात येणार आहेत. 

एका क्लिकवर माहिती होणार उपलब्ध'अपार'मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे मॉनिटरिंग सोपे होणार आहे. 'अपार आयडी तयार झाल्यानंतर तो डिजीलॉकरला जोडण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात साधलेले लक्ष्य दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल, उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांमधील यश आदी माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAmravatiअमरावती