‘त्या‘ अपघातातील दुसऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:13 IST2021-04-01T04:13:45+5:302021-04-01T04:13:45+5:30

दर्यापूर : श्वानाने चावा घेतल्याने त्यावर औषधोपचार करण्यासाठी अमरावती येथे जात असताना दुचाकी अपघातात प्रशांत रामदास आसरे ३०, रा. ...

Another teenager in the accident died during treatment | ‘त्या‘ अपघातातील दुसऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

‘त्या‘ अपघातातील दुसऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

दर्यापूर : श्वानाने चावा घेतल्याने त्यावर औषधोपचार करण्यासाठी अमरावती येथे जात असताना दुचाकी अपघातात प्रशांत रामदास आसरे ३०, रा. दर्यापूर) या युवकाचा सोमवारी सायंकाळी घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला मित्र अनूप विनायकराव कुलट (३६) हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. दरम्यान त्याचाही बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याने एकाच गल्लीतील दोन्ही परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

प्रशांत आसरे व अनूप कुलट हे सोमवारी दुपारी येवदानजीकच्या भुरस रामागड येथे गेले होते. त्या गावातील मोकाट श्वानाने प्रशांतच्या हाताला चावा घेतला. त्यावर दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील औषधोपचारासाठी दोघे दुचाकी क्रमांक एम.एच.२७-२८१५ ने सायंकाळी ७ वाजतादरम्यान अमरावती येथे जात असताना लखापूर फाट्यानजीकची त्यांच्या दुचाकीचा टायर फुटला. यात प्रशांत आसरे यांचा सोमवारी सायंकाळी ७.३० दरम्यान घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचे सोबत असलेला अनूप कुलट यांचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत प्रशांत हे राज्य परिवहन मंडळात तांत्रिक कर्मचारी म्हणून नोकरीवर होते. अनूप कुलट हे दुचाकी दुरुस्तीचे काम करत होते.

Web Title: Another teenager in the accident died during treatment