तपोवनमध्ये आणखी एक बलात्कार

By Admin | Updated: December 21, 2014 22:50 IST2014-12-21T22:50:11+5:302014-12-21T22:50:11+5:30

‘तपोवन’ येथील मुलींच्या वसतिगृहातील अनाथ मुलीवर बलात्काराची शाई वाळत नाही तोच या बालगृहातील दुसऱ्या मुलीवरही अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीने गाडगेनगर

Another rape in Tapovan | तपोवनमध्ये आणखी एक बलात्कार

तपोवनमध्ये आणखी एक बलात्कार

महिनाभरातील दुसरी घटना : पीडित मुलीची गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार
अमरावती : ‘तपोवन’ येथील मुलींच्या वसतिगृहातील अनाथ मुलीवर बलात्काराची शाई वाळत नाही तोच या बालगृहातील दुसऱ्या मुलीवरही अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी तपोवन परिसरात एका १४ वर्षीय अनाथ मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारा संस्थेचा पदाधिकारी गजानन चुटे यालाही गजाआड करण्यात आले. हे प्रकरण चौकशीत असतानाच आणखी एका मुलीवर बलात्काराची घटना २० डिसेंबर रोजी उघड आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
तपोवनमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील एका खोलीत नेऊन पुन्हा एका १५ वर्षीय अनाथ मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तपोवन येथील एका कर्मचाऱ्याने पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून बलात्कार केल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यांत दाखल झाली आहे.
आरोपी हा वसतिगृहात काम करणारा काका असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले असून अद्यापपर्यंत आरोपीचे नाव समोर आलेले नाही. पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३७६(२)(डी)(आय), लैंगिक अपराध, बालसरंक्षण आणि नियम-२०१२-४, ६, ८, १०, १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Another rape in Tapovan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.