आणखी एकाला अटक

By Admin | Updated: September 1, 2015 23:59 IST2015-09-01T23:59:55+5:302015-09-01T23:59:55+5:30

अचलपूर येथे अमित बटाऊवाले याची भरदिवसा बारुद गँगच्या टोळीने हत्या केली होती.

Another person arrested | आणखी एकाला अटक

आणखी एकाला अटक

आज न्यायालयात हजर करणार : ११ मुख्य आरोपींमधील एक फरार
अमरावती/अचलपूर : अचलपूर येथे अमित बटाऊवाले याची भरदिवसा बारुद गँगच्या टोळीने हत्या केली होती. यातील एका आरोपीला मंगळवारी पोलिसांनी शिताफीने अटक केली. याप्रकरणी मुख्य ११ आरोपींमधील एक आरोपी फरार असून आता अटकेतील आरोपींची संख्या १०वर पोहोचली आहे.
अचलपूर परिसरात बारूद गँगने दहशत पसरविली होती. अवैध रेती तस्करीला मोहन बटाऊवाले यांनी त्यांच्या शेतातून वाहतूक करण्यास मज्जाव केल्याने त्यांचा मुलगा अमित बटाऊवाले याची भरदिवसा हत्या करण्यात आली. यातील मुख्य ११ आरोपींपैकी मंगळवारी एका आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली.
इशान अली वल्द सज्जाद अली ऊर्फ इशान शुटर असे त्याचे नाव आहे. आता आरोपींची संख्या १० झाली आहे. मात्र यातील एक आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ही कारवाई सरमसपुराचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली. बुधवार २ सप्टेंबर रोजी आरोपीला येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
त्यानंतर पुढील कारवार्ई केली जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: Another person arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.