बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:12 IST2021-01-15T04:12:18+5:302021-01-15T04:12:18+5:30

अमरावती : वाढती महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले निवारागृहे, आणि विशेष दत्तक संस्थांमधील प्रत्येक बालकांसाठी प्रतिमहा दोन ...

Annual increase of child nutrition subsidy in children's institutions by 8% | बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ

बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ

अमरावती : वाढती महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले निवारागृहे, आणि विशेष दत्तक संस्थांमधील प्रत्येक बालकांसाठी प्रतिमहा दोन हजार रुपये याप्रमाणे लागू असणाऱ्या परिपोषण अनुदानाच्या दरात वार्षिक ८ टक्के वाढ करण्यास व ती २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून लागू करण्यास मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

बालकल्याण समितीच्या बैठका दरमहा १२ वरून २० करण्यास तसेच या समितीच्या व बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्यात एक हजार रुपयांवरून दीड हजार रुपये करण्यासदेखील बैठकीत मान्यता देण्यात आली. ही योजना राज्यात सन २०१२-१३ पासून महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण सोसायटीमार्फत राबविण्यात येत आहे. अंब्रेला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील उपयोजनांची नवीन नावे लागू करणे व योजनांमधील विविध बाबींचे सुधारित दर लागू करण्यास यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, ‘बाल संरक्षण सेवा’ या उपयोजनेच्या दरात केलेल्या सुधारणेप्रमाणे बदल अद्याप अंमलात आलेले नाहीत. परिणामी निधी वितरित करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Annual increase of child nutrition subsidy in children's institutions by 8%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.