यंदाच्या हंगामाकरिता पीककर्जाचे दर जाहीर
By Admin | Updated: May 21, 2016 00:11 IST2016-05-21T00:11:50+5:302016-05-21T00:11:50+5:30
जिल्ह्यात सन २०१६-१७ या वर्षासाठी ३६ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे.

यंदाच्या हंगामाकरिता पीककर्जाचे दर जाहीर
२१४५ कोटींचे लक्ष्य : तांत्रिक गट समितीने मंजूर केले दर
अमरावती : जिल्ह्यात सन २०१६-१७ या वर्षासाठी ३६ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी २ लाख ९६ हजार ९९९ शेतकरी खातेदारांना खरीप-रबी असे एकूण २ हजार १४५ कोटी ६८ लाखांचे कर्जवाटप करण्यात येणार आहे. यंदाच्या हंगामात पीककर्ज वाटपासाठी जिल्हा तांत्रिक गटसमितीने पीककर्जाचे दर मंजूर केले आहेत.
मंजूर केलेल्या दरात संकरीत ज्वारीसाठी किमान २२ हजार ते किमान २४ हजार, करडईसाठी १३ हजार ते १४ हजार, धानपिकासाठी ३८ हजार ते ४४ हजार गवती पिके (लेसर्न, बर्सीन) २२ ते २४ हजार , कांदा व भाजीपाला (सेट नेटसह) ५० ते ५५ हजार, कांदा व भाजीपाला पिकासाठी ४४ ते ५५ हजार, इतर भाजीपाल्यासाठी २७ ते ३३ हजार, भुईमूग खरीप २८ ते ३० हजार, भुईमूग रबी ३६ ते ३८ हजार, एरंडी ११ ते १३ हजार, मिरची बागायती ६२ ते ६४ हजार, पपई ४२ ते ४५ हजार, बटाटा -रताळे ६० ते ६६ हजार, संत्रा-मोसंबी प्रति झाड ३१० ते ३२०, डाळींब ७५ ते ८५ हजार, लिंंबू ६० ते ६२ हजार, केळी साधारण ८५ ते ८८ हजार, केळी टिश्युक्लचर ९० ते १ लाख १५ हजार, ऊस ७७ ते ८८ हजार, ऊस पूर्वहंगामी ७७ ते ९० हजार, ऊस खोडवा ६६ ते ७५ हजार, हळद ८० ते ८८ हजार, अदरक ८० ते ८८ हजार, आंबा ५५ ते ६० हजार, चिकू, पेरु ५५ ते ५२ हजार, सीताफळ ४५ ते ४९ हजार, आवळा, बोर ३५ ते ३८ हजार, पानपिंपळी ७० ते ८५ हजार व फूल शेतीसाठी किमान ६० हजार ते कमाल ८५ हजार असे जिल्हा तांत्रिक समितीने शिफारस केलेले दर आहेत. त्यानुसार यंदाच्या हंगामात खरीप व रबी पिकांना कर्जवाटप होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित बँकांकडे पीककर्जाची मागणी करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)