कोरोना महामारीची वर्षपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST2021-04-04T05:00:00+5:302021-04-04T05:00:53+5:30
मुमताजच्या कुटुंबातील २४ सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे सर्व जण आता ठणठणीत बरे झाले आहेत. या सर्व सदस्यांकडून कुटुंबीयांसह इतरांचीही काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, आरोग्य यंत्रणेला मोठे सहकार्य या कुटुंबाकडून मिळत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.

कोरोना महामारीची वर्षपूर्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिल २०२० रोजी आढळून आला होता. मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना संक्रमित असल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले होते. हाथीपुरा येथील ४० वर्षीय मुमताज ऑटोवाला तथा मुमताज अहमद खान असे या जिल्ह्यातील पहिल्या कोरोना संक्रमिताचे नाव आहे. त्याचा घरीच मृत्यू झाला होता.
मुमताजच्या कुटुंबातील २४ सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे सर्व जण आता ठणठणीत बरे झाले आहेत. या सर्व सदस्यांकडून कुटुंबीयांसह इतरांचीही काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, आरोग्य यंत्रणेला मोठे सहकार्य या कुटुंबाकडून मिळत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.
कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार होण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने खासगी व सरकारी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड केअर आराेग्य केंद्र तर डेडिकेडेट कोविड हाॅस्पिटल असे एकूण ४५ दवाखाने उपलब्ध केले आहे.
पुरेसा औषधसाठा
जिल्ह्यात २६ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, १५ कोविड केअर आराेग्य केंद्र तर,चार डेडिकेडेट कोविड हाॅस्पिटल कार्यरत आहे. कोरोना संक्रमित रूग्णांवर ४५ ठिकाणी उपचार सुरु आहे. या सर्व खासगी, सरकारी दवानखान्यात आयसीयू, ऑक्सीजन, व्हेन्टिलेटर आणि जनरल बेडसह औषधी साठा पुरेसा असल्याची माहिती आहे. तसेच कोरोना रूग्णांंवर होणाऱ्या उपचार दरावरही जिल्हा प्रशासनाने नियंत्रण चालविले आहे.
दुसरा पॉझिटिव्ह कुटुंबीयांची जबाबदारी हाताळतोय
जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबातील २४ सदस्यांना पीडीएमसीत क्वांरटाईन करण्यात आले. त्यापैकी चार जण संक्रमित आढळून आले होते.
चार पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर जणांना येथील सुपर स्पेशालिटी कोरोना रुग्णालयात उपाचासाठी दाखल केले होते. यात मृत संक्रमिताची पत्नी, दोन भाऊ व मुलाचा समावेश होता.
मृत संक्रमिताचा धाकटा भाऊ ठणठणीत आहे. तो कुटुंबीयांची काळजी घेतो. ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकत आहे.