अण्णाभाऊ साठे, राणी दुर्गावतीचा पुतळा बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 00:03 IST2016-07-31T00:03:10+5:302016-07-31T00:03:10+5:30

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व विरांगणा राणी दुर्गावती यांचे पूर्णाकृती पुतळे आठ दिवसाच्या आत न बसविल्यास ...

Annabhau Sathe, statue of the Queen Durgavati will be installed | अण्णाभाऊ साठे, राणी दुर्गावतीचा पुतळा बसवा

अण्णाभाऊ साठे, राणी दुर्गावतीचा पुतळा बसवा

 रवी राणा : शासनाला मागणीचे निवेदन
अमरावती : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व विरांगणा राणी दुर्गावती यांचे पूर्णाकृती पुतळे आठ दिवसाच्या आत न बसविल्यास मातंग व आदिवासी समाजातील लोकांना सोबत घेऊन युवा स्वाभिमान रस्त्यावर येऊन आंदोलन छेडेल, असा ईशारा आ. रवि राणा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १ आॅगस्ट हा जयंती दिन आहे. याच पर्वावर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याची मागणी त्यांनी केली आहे. आदिवासींचे प्रेरणास्थान असलेल्या राणी दुर्गावती यांचाही पुर्णाकृती पुतळा गर्ल्स हायस्कूल चौकात बसवावा. हे दोन्ही पुतळे आठ दिवसाच्या आत बसविण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी गित्ते यांना आदेश द्यावे, जयंती दिनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण होईल. अशा पद्धतीने नियोजन निधी उपलब्धता व इतर बाबींची पूर्तता करावी, अशी मागणी आ. रवि राणा यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आ. राणा यांनी सांगितले.

Web Title: Annabhau Sathe, statue of the Queen Durgavati will be installed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.