शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात अंनिसद्वारा जनजागृती अभियान

By admin | Updated: May 30, 2015 00:35 IST

आदिवासी विकास विभागाच्यावतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धारणी यांच्या कार्यक्षेत्रातील..

गावागावांत सभा : आदिवासी विकास विभागाचे महत्त्वपूर्ण पाऊलअमरावती : आदिवासी विकास विभागाच्यावतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धारणी यांच्या कार्यक्षेत्रातील मेळघाट परिसरात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा शाखेद्वारे आयोजित ‘आरोग्य विषयक अंधश्रद्धा निर्मूलन जाणिव जागृती कार्यक्रमांना मेळघाटातील जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आदिवासींमधील आरोग्य विषयक अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तसेच अनिष्ट व अघोरी उपचारांबाबत जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबविण्याचे राज्य शासनाने उचललेले हे एक महत्वाचे आणि क्रांतीकारी पाऊल ठरत आहे. आरोग्य विषयक अंधश्रद्धा निर्मूलन जाणीव जागृती अभियानाची सुरुवात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ५ मे रोजी अभियान रथाला हिरवी झेंडी दाखवून केली. ७ मे रोजी चिखलदरा तालुक्यातील माखला येथून जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात झाली. ७ मे ते १७ जून २०१५ पर्यंत एकूण ८४ अतिदुर्गम गावांमध्ये हे अभियान पोहोचणार आहे. दरदिवशी २ गावांमध्ये २ जागृती पथके प्रबोधन करीत आहे. आतापर्यंत माखला, भवई, पिली, चुनखडी, माडीझडप, केली, केशरपूर, चिखली, पाटकाऊ, बोरीखेडा, राक्षा, तारूबांदा, अढाव, हरिसाल, कोटा, चौराकुंड, नांदुरी, ढाकणा, सावऱ्या, गडगा (भांडूम), बिजुधावडी, तातरा, झिलांगपाटी, बोड, बेदाबल्ला, बारु, टोली, घुटी, मांडू, आकी, झापल, बोबदो, टिटंबा, मोगर्दा, सावऱ्या, राणीतंबोली, रत्नापूर, बाबंदा अशा एकूण ३९ गावांमध्ये जनप्रबोधन सभा झाल्या आहेत. या अभियानासाठी अपर आयुक्त अशोक आत्राम, उपायुक्त महादेव रार्घोते, प्रकल्प अधिकारी धारणी, नितीन तायडे, सहायक प्रकल्प अधिकारी पी.बी.पोळ, सहायक प्रकल्प अधिकारी एन.के. सोनकांबळे, अभियानाचे संयोजक मंगेश खेरडे, कार्यक्रम संयोजक हरिष केदार हे विशेष लक्ष ठेऊन आहेत. अभियानासाठी प्रत्येक गावातील सरपंच, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका सहकार्य करीत आहेत. अभियानाचे मार्गदर्शक म्हणून गणेश हलकारे, राज्य संघटक दिलीप सोळंके, राजू खिराडे, नरेश कुऱ्हेकर, सुनील मुंदाणे, सुधाकर चिलात्रे हे प्रबोधन करीत आहेत तर सहाय्यक म्हणून राजेंद्र भांबोरे, अजय केने, अमित आकोटकर, नीलेश खंडारे, उज्ज्वल थोरात, पुरूषोत्तम दाहेदार, यशवंत मौड, विनोद वानखडे, श्याम नळकांडे, श्रीकांत भटुरकर, रवींद्र बुल, जीवन सरदार हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)