अंजनगाव सुर्जीत वीज अभियंत्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:43+5:302021-03-23T04:14:43+5:30
अंजनगाव सुर्जी : वीजचोरी पकडण्यास गेलेल्या महावितरणच्या पथकातील अभियंत्यास व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. स्थानिक आलम चौक येथे २२ ...

अंजनगाव सुर्जीत वीज अभियंत्याला मारहाण
अंजनगाव सुर्जी : वीजचोरी पकडण्यास गेलेल्या महावितरणच्या पथकातील अभियंत्यास व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. स्थानिक आलम चौक येथे २२ मार्च रोजी ही घटना घडली.
येथील वाजिदखान रियाज्जुल्ला खान यांच्या घरात मीटरमधून डायरेक्ट पद्धतीने वायर टाकून वीज चोरी होत असल्याचे पथकातील सहायक अभियंता संदीप गुजर व सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना आढळून आला. तो प्रकार विद्युत चोरीत मोडत असल्याने कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरील फोटो व व्हिडीओ काढला असता आरोपी वजित खान रियाज्जुला खान यांनी सहायक अभियंता गुजर व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. आरोपीसह इतर चार इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तथा नीलेश बर्वे या सहकारी कर्मचाऱ्याचा मोबाइल हिसकावून आरोपीने काढलेले व्हिडीओ व फोटो जबरदस्तीने डिलीट केले. संदीप गुजर यांनी याबाबत आरोपी रियाजुल्ला अधिक अनोळखी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-----------------