अंजनगाव सुर्जी पोलिसांची अवैध दारुविक्रीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST2021-03-13T04:23:32+5:302021-03-13T04:23:32+5:30
तालुक्यातील हिरापूर येथील राजू बावनथडे (४२) याच्या घरातून देशी दारू जप्त करण्यात आली. ८४०० रुपयांचा दारूची सातेगाव ...

अंजनगाव सुर्जी पोलिसांची अवैध दारुविक्रीवर धाड
तालुक्यातील हिरापूर येथील राजू बावनथडे (४२) याच्या घरातून देशी दारू जप्त करण्यात आली. ८४०० रुपयांचा दारूची सातेगाव फाट्यावरून वाहतूक करताना मंगेश सुखदेवे (३८, रा. निमखेड बाजार) व मंगेश सहारे (२४, रा.हिरापूर) यांना अटक करण्यात आली. तुरखेड येथील नागोराव पुंडकर (५०) याचेजवळून ७५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पी.पी.काईट, अंमलदार पवन पवार यांनी केली. अंजनगाव सुर्जी उपविभागीय पोलीस कार्यालयाअंतर्गत अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे तालुक्यातील पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
बाँक्स
दारू विक्रेत्यांवर कारवाई, परवानाधारक मोकाटच
अंजनगाव सुर्जी पोलीसांनी फक्त दारु विक्रेत्यांवर कारवाई केली. पंरतु ,ज्या दुकानदारांनी एवढा मोठा माल दिला तो मोकाटच कसा, असा प्रश्न नागरिकांना पडाला आहे. त्या दुकानदारावर कारवाईची मागणी होत आहे.
राज्य उत्पादन शुल्क या कार्यालयांतर्गत अवैध दारू विक्री करणारा व अवैध दारू देणाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु हे कार्यालयातील अधिकारी फक्त वसुलीसाठी दरमहिन्याला येतात, असे एका दारुविक्रेत्याने सांगितले.