अंजनगावात आमदाराच्या घराला घेराव

By Admin | Updated: June 8, 2017 00:05 IST2017-06-08T00:05:05+5:302017-06-08T00:05:05+5:30

शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी काँग्रेसने आंदोलनाचा मोर्चा सांभाळला. तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंडण केले.

Anjagat the house of the MLA | अंजनगावात आमदाराच्या घराला घेराव

अंजनगावात आमदाराच्या घराला घेराव

तिवस्यात मुंडन : काँग्रेस आक्रमक, गुरुकुंज येथे डाव्यांचा चक्काजाम
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी काँग्रेसने आंदोलनाचा मोर्चा सांभाळला. तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंडण केले.
कर्जमाफीच्या आश्वासनामुळे राज्यातील जनतेने भाजपला भरभरून मतदान केले. परंतु यासरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच काय दुष्काळी मदतही दिली नाही. त्यामुळे मागील तीन वर्षांत राज्यातील जवळपास १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांच्या उग्र भावना
तिवसा : ही घोषणा म्हणजे फसवेगिरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उग्र भावना लक्षात घेऊन शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. तत्पूर्वी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला.
यावेळी नगरसेवक मधुकर भगत, पंचायत समिती सदस्य मंगेश भगोले, पं.स सदस्य लुकेश केने, आनंद शर्मा यांच्यासह दिलीप काळबांडे, सागर राऊत, रितेश पांडव, अतुल देशमुख, रामराव तांबेकर, नरेंद्र विघ्ने, योगेश वानखडे, प्रफुल्ल देशमुख, सचिन गोरे, दिवाकर भुरभुरे, स्वप्नील गंधे, सुरेंद्र साबळे, सागर बोडखे, उमेश ठाकरे, प्रशिक शापामोहन, अंकुश देशमुख, वैभव काकडे, अंकुश बनसोड, राजिक शहा आदी उपस्थित होते.

बुंदिलेंचे घेरले घर
दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मतदारसंघाचे आ. रमेश बुंदिले यांच्या अंजनगांव येथील घराला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दुपारी घेराव घातला. यावेळी शासनविरोधी नारेबाजी करण्यात आली. आ. बुंदिले घरी नसल्याने त्यांच्या स्विय सहायकांनी आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढली. मात्र, आंदोलक आक्रमक असल्याने परिसरात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

गुरूकुंज मोझरीत चक्काजाम
शेतकरी आदोलनाच्या समर्थनार्थ डाव्या पक्षांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपुढे बुधवारी चक्काजाम आंदोलन केले. आंदोलकांनी सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरला होता. यावेळी दोन्ही बाजुने वाहतूक खोळंबली होती. परिसरातील किसान एकता मंच, एसएफआय, डीवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी याआंदोलनाचे नेतृत्व केले. याआंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणिय ठरली. या वेळी ‘फडणवीस सरकार बदलनी है, मोदी सरकार हटानी है’ सारख्या सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. तिवसा पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन समाप्त केले.

Web Title: Anjagat the house of the MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.