संतप्त मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह दुकानदारांच्या घेतल्या कानपिचक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 06:00 AM2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:52+5:30

कोरोना विषाणूसंदर्भात परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरांत घाणीचे साम्राज्य पसरल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यावर बुधवारी दुपारी १ च्या सुमारास मुख्याधिकारी हे आठवडी बाजारात दाखल झाल्या. त्यामुळे एकच पळापळ झाली. अनेकांनी प्लास्टिक कॅरीबॅगची लपवाछपवी केली.

Angry chiefs took the staff and the shopkeepers with them | संतप्त मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह दुकानदारांच्या घेतल्या कानपिचक्या

संतप्त मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह दुकानदारांच्या घेतल्या कानपिचक्या

Next
ठळक मुद्देदंड ठोठावला : परतवाड्याच्या आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : जगभरात कोरोना विषाणूबाबत सतर्कता बाळगली जात असताना अखेर अचलपूर पालिकेला जाग आली. बुधवारी आठवडी बाजारातील घाणीचे अवलोकन केल्यानंतर मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी कर्मचाºयांसह पालेभाज्या विक्रेत्यांच्या कानपिचक्या घेतल्या. प्लास्टिकबंदी झुगारणाऱ्यांना दंडही ठोठावला.
कोरोना विषाणूसंदर्भात परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरांत घाणीचे साम्राज्य पसरल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यावर बुधवारी दुपारी १ च्या सुमारास मुख्याधिकारी हे आठवडी बाजारात दाखल झाल्या. त्यामुळे एकच पळापळ झाली. अनेकांनी प्लास्टिक कॅरीबॅगची लपवाछपवी केली. पालेभाज्या विक्रीच्या ठिकाणी उरलेल्या अवशेषातून नाल्यांमध्ये घाण निर्माण झाल्याचा प्रकार त्यांच्या नजरेस आला. या विषयात संतप्त मुख्याधिकाऱ्यांनी दुकानदारांना स्वच्छताविषयी खडसावले. अनेकांना पाचशे रुपये दंडही ठोठावला. विक्रीच्या ठिकाणीच पालेभाज्या फेकून घाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Angry chiefs took the staff and the shopkeepers with them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.