शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पाहिले रागाने, ‘गेम’ केला तिघाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

फ्रेजरपुरा येथील कुळसंगे यांच्या घरासमोर २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडलेल्या यश तिलकचंद मंडले (२१, रा. फ्रेजरपुरा) याच्या खुनाची ही पार्श्वभूमी. पानटपरीचालक यशच्या खुनाच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी लागलीच ललित ऊर्फ बिट्टू फुलचंद तिवारी (२५, यशोदानगर नं. ४), साहिल देवीदास चांदेकर (२०, उत्तमनगर गल्ली नं. १) व अनिकेत जयश्रीराम सुरसाऊत (२१, नमुना गल्ली नं. ६) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४१, ३४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रस्त्याने जात असताना समोरचा तरुण रागाने पाहत असल्याचा गैरसमज करीत त्यातून मोठा वाद जन्माला आला. शिवीगाळ झाली. लोकही जमा झाले. चाकू काढून पाहून घेण्याची धमकीदेखील देण्यात आली. मात्र, वाद वाढू नये, म्हणून त्यावेळी पोलीस ठाण्याची पायरी कुणी चढले नाही. त्या वादाचा वचपा म्हणून ३५ दिवसांनी एका तरुणाला तिघांनी चाकूने भोसकून ठार केले. फ्रेजरपुरा येथील कुळसंगे यांच्या घरासमोर २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडलेल्या यश तिलकचंद मंडले (२१, रा. फ्रेजरपुरा) याच्या खुनाची ही पार्श्वभूमी. पानटपरीचालक यशच्या खुनाच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी लागलीच ललित ऊर्फ बिट्टू फुलचंद तिवारी (२५, यशोदानगर नं. ४), साहिल देवीदास चांदेकर (२०, उत्तमनगर गल्ली नं. १) व अनिकेत जयश्रीराम सुरसाऊत (२१, नमुना गल्ली नं. ६) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४१, ३४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी मृताचा मोठा भाऊ शुभम मंडले याने २६ ऑक्टोबर रोजी पहाटे तक्रार नोंदविली.यश ऊर्फ मटरू हा त्याच्या लहान चुलतभावासोबत पानठेल्याचा माल आणण्यासाठी बाजारात गेला. सायंकाळी ७ च्या सुमारास ते परत येत असताना कुळसंगे यांच्या घरासमोर यशची दुचाकी अडविली. साहिल चांदेकरने यशला पकडून दुचाकीच्या खाली पाडले, तर बिट्टू तिवारी याने यशच्या छातीवर, पोटावर, पाठीवर चाकूने अनेक वार केले. अनिकेत सुरसाऊतने यशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यशला रक्तबंबाळ स्थितीत तेथेच टाकून तिघांनीही तेथून पळ काढला. त्याला तातडीने इर्विनमध्ये हलविण्यात आले. तेथून दोन खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास यशचा मृत्यू झाला. पुढील तपास ठाणेदार राहुलकुमार आठवले, पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस