जरूड परिसरासाठी आरोग्य सेवक बनला देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:12 IST2021-05-19T04:12:58+5:302021-05-19T04:12:58+5:30
फोटो पी १८ जरूड पान २ ची बॉटम जरूड : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतील कठीण काळात खेड्यापाड्यातील लोक ...

जरूड परिसरासाठी आरोग्य सेवक बनला देवदूत
फोटो पी १८ जरूड
पान २ ची बॉटम
जरूड : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतील कठीण काळात खेड्यापाड्यातील लोक दररोज मृत्युमुखी पडत असताना, सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. कोरोना रुग्णांच्या आसपासही कोणी फिरकत नसताना, जरूड येथील आरोग्य सेवक राजीव चारपे देवदूत ठरले आहेत. प्रत्येक कोरोनाग्रस्ताच्या घरी रात्री-बेरात्री जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करून औषधोपचार ते करतात.
जरूड हे गाव दाटीवाटीचे असल्यामुळे येथे २० ते २५ कोरोनाग्रस्तांची दररोज भर पडत आहे. त्याचा स्थानिक आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त भार पडत असला तरी जरूड येथे आरोग्य सेवक या पदावर सेवा देत असलेले राजीव चरपे हे प्रत्यक्ष कोरोनाग्रस्ताच्या घरी जाऊन समुदेशन, औषधो पचार करतात. प्रत्येक जण आपल्या जिवाची काळजी करीत असताना, राजीव चरपे मात्र माझा जन्मच रुग्णसेवेसाठी झाला आहे, असे सांगत प्रत्येक रुग्णाची आपुलकीने विचारपूस करतात. रात्री १२ वाजेपर्यंत ते काम करीत असतात. या बोलत्या चालत्या देवदूताचे सर्वत्र कौतुक होत आहे. सरपंच सुधाकर मानकर यांनी अप्रतिम आरोग्य सेवा देत असलेल्या आशा वर्कर, आरोग्य सेवक व वैद्यकीय अधिकारी या आरोग्यदूतांचे विशेष आभार मानले आहेत.