अंगणवाडीतील बालक ांच्या गणवेशाचे नियोजन कोलमडले
By Admin | Updated: September 16, 2014 23:25 IST2014-09-16T23:25:57+5:302014-09-16T23:25:57+5:30
जिल्हयातील सुमारे २ हजार ५०६ अंगणवाडी केंद्रात शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब बालकांना दिला जाणाऱ्या गणवेश वितरण धोरणाबाबतचे नियोजन मागील १० वर्षापासुन कोलमडले आहे.

अंगणवाडीतील बालक ांच्या गणवेशाचे नियोजन कोलमडले
अमरावती : जिल्हयातील सुमारे २ हजार ५०६ अंगणवाडी केंद्रात शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब बालकांना दिला जाणाऱ्या गणवेश वितरण धोरणाबाबतचे नियोजन मागील १० वर्षापासुन कोलमडले आहे.
विशेष म्हणजे यापुर्वी या बालकांना गणवेश देण्यासाठी जिल्हा परिषदेत तरतुद केली जात होती मात्र आतापर्यत झालेल्या विविध योजनाच्या नियोजनात ही योजनाच बाद झाली आहे. परीणामी ही चिमुकले आजही गणवेशापासुन वंचित आहेत.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हयातील १४ तालुक्याअंतर्गत येत असलेल्या सुमारे २५०६ अंगणवाडी केंद्रात शिक्षण घेणाऱ्या बालकांचा गणवेश देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे . जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडीतील बालकांसाठी आवश्यक त्या योजना राबविण्यात येत आहेत. बालकांना गणवेशाचा पुरवठा करण्यासाठी आदिवासी उपाययोजनेंतर्गत व विशेष घटक योजनेंतर्गत लाखो रूपयांची तरतूद केली जाते. गणवेश खरेदी करीता निधीची तरतूद केली जात नाही. परीणामी १० वर्षापासून बालकांना गणवेशापासून वंचित ठेवण्यात आले. शासनस्तरावरून अंगणवाडीतील बालकांच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही परिणामी योजनांचा केवळ गाजावाजा करण्यात येतो मात्र लाभ मिळत नाही. (प्रतिनिधी)