अन् गाडी जाताच कोसळले रेल्वे गेट
By Admin | Updated: October 25, 2016 00:16 IST2016-10-25T00:16:57+5:302016-10-25T00:16:57+5:30
सकाळी ११.२० वाजताची वेळ. दिवाळी तोेंडावर असल्याने बाजारपेठ फुललेली. रस्त्यावर प्रचंड वर्दळ.....

अन् गाडी जाताच कोसळले रेल्वे गेट
गोपालनगर रेल्वे क्रॉसिंगवरील घटना : मोठा अपघात टळला
अमरावती : सकाळी ११.२० वाजताची वेळ. दिवाळी तोेंडावर असल्याने बाजारपेठ फुललेली. रस्त्यावर प्रचंड वर्दळ. गोपालनगर रेल्वे क्रॉसिंगवरून एक रेल्वे पास होणार होती. दोन्ही बाजुंनी वाहने थांबलेली. तेवढ्यात अर्धवट बंद झालेल्या रेल्वे गेटमधून गाडी काढताना एक मालवाहून वाहन या गेटवर जोरदार धडकले. नंतर हे गेट बंद करण्यात आले. मात्र, रेल्वे पास होताच ते गेट उघडत असताना हे गेट निखळून चक्क खाली कोसळले.
शेकडो वाहनधारक तेथे असताना मोठा अपघात घडू शकला असता. सुदैवाने तशी वेळ आली नाही. रेल्वे गेट बंद होत असतानाही तेथून निघण्याची वाहनधारकाची घाई नडली आणि रेल्वे गेट तुटले. यातून मोठा अपघात सुद्धा घडला असता. यामुळे त्याठिकाणी काही वेळ मोठा गोंधळ उडाला.
रेल्वे विभागाचे सिग्नल सर्विहस इंजिनिअर रवी पराते हे या तुटलेल्या रेल्वे गेटची डागडुजी करीत आहेत. लवकरच हे गेट दुरूस्त केले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)