...आणि अस्मितेसाठी नेते विसरले पक्षभेद !

By Admin | Updated: September 23, 2016 00:13 IST2016-09-23T00:13:40+5:302016-09-23T00:13:40+5:30

कोपर्डी बलात्कार खटल्यातील आरोपींना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरूस्ती, मराठा आरक्षण आदी मागण्यांसाठी गुरूवारी मराठ्यांनी जाज्वल्य एल्गार पुकारला.

... and the leaders forgot the differences in the conflicts! | ...आणि अस्मितेसाठी नेते विसरले पक्षभेद !

...आणि अस्मितेसाठी नेते विसरले पक्षभेद !

एकजुटीचे ऐतिहासिक दर्शन : मोर्चाचा मार्ग भगवामय
अमरावती : कोपर्डी बलात्कार खटल्यातील आरोपींना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरूस्ती, मराठा आरक्षण आदी मागण्यांसाठी गुरूवारी मराठ्यांनी जाज्वल्य एल्गार पुकारला. या मोर्चात पक्षभेद विसरून मराठा नेते एकवटल्याने एकजुटीचे आगळेवेगळे दर्शन घडले. नेहरू मैदान ते गर्ल्स हायस्कूल चौक गर्दीने नुसता फुलून गेला होता. भगव्या झेंड्यांनी आसमंत झळाळला होता.
महिनाभरापासून मराठा मूकमोर्चासाठी नियोजनाची प्रक्रिया राबविली होती. ते नियोजन किती काटेकोर होते, याची प्रचिती मोर्चा निघाल्यानंतर आली. स्वंयसेवकांची फौज शहरात ठिकठिकाणी तैनात होती. शहराच्याच नव्हे, तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा तरूण-तरूणींनी स्वयंसेवा देण्यासाठी पुढाकार घेतला होता. परिणामी मोर्चात कुठेही गोंधळ निर्माण झाल्याचे आढळले नाही. सात तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या महामोर्चाचे नेतृत्व राजकीय पुढाऱ्यांऐवजी सामान्य कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आले होते. विनानेतृत्व निघालेल्या या मोर्चातील महिलांचा लक्षणीय सहभाग बोलका ठरला.
मराठा समाजातील वकील, अभियंते, डॉक्टर, नोकरदारवर्गाचा मोर्चातील सहभाग लक्षात घेता मराठा समाजाच्या भावना किती तीव्र आहेत, याची जाणीव होत होती. मूकमोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाचे नेतेदेखील मागे नव्हते, हे विशेष.
मोर्चात प्रामुख्याने पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, मोर्शीचे आ.अनिल बोंडे, धामणगाव रेल्वेचे आ.वीरेंद्र जगताप, तिवस्याच्या आ.यशोमती ठाकूर, अकोटचे आ.प्रकाश भारसाकळे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, माजी आमदार सुलभा खोडके, भाजपाच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, आ.सुनील देशमुख यांच्या अर्धांगिनी डॉ.सोनाली देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय बंड, प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, महापालिका स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, चेतन पवार, शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर, शिवसेना समर्थित नगरसेवक प्रदीप बाजड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे, महापालिका काँग्रेसच्या नगरसेविका अर्चना इंगोले, मिलिंद बांबल, नूतन भुजाडे, जनविकास काँग्रेसच्या नगरसेविका सुजाता झाडे, माजीमंत्री शरद तसरे, मोर्शीचे अशोक रोडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वृषाली विघे, काँग्रेसच्या नेत्या पुष्पाताई बोंडे, सुरेखा लुंगारे, विलास इंगोले, राजेंद्र महल्ले, बंडू हिवसे, धीरज हिवसे, अमोल ठाकरे, दिनेश बूब, प्रल्हाद ठाकरे, शिवसेनेचे नाना नागमोते, बाळासाहेब हिंगणीकर, राजेंद्र तायडे, गजानन वाकोडे, महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे पप्पू पाटील, मयुरा देशमुख, भाजपा नेते रुपेश ढेपे, संध्या टिकले, प्रकाश अढाऊ, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती गिरीश कराळे, अमरावती पंचायत समितीचे सभापती आशिष धर्माळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनंत साबळे, जि.प. सदस्य ममता भांबुरकर, मोहन पाटील, उमेश केने आदी मराठा नेत्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: ... and the leaders forgot the differences in the conflicts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.