लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना मद्यधुंद इसम नारे देत धावत आला आणि थेट स्टेजवर चढला. त्यामुळे काही क्षणापुरता गोंधळ निर्माण झाला होता. उपस्थित पोलीस व कार्यकर्त्यांनी त्याला तात्काळ स्टेजवरून उचलून बाहेर नेले आणि जयंत पाटलांचे भाषण पुन्हा सुरू झाले.अचलपूर येथील कृषिउत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात बुधवारी ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेला हजारो महिला-पुरुषांनी हजेरी लावली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आदी सर्वच नेते मंचावर उपस्थित होते. जयंत पाटील यांनी विविध मुद्यांना हात घालत मोदी सरकारसह राज्य शासनाच्या कामकाजावर प्रहार केला. राष्ट्रवादीच्या माजी मंत्री वसुधाताई देशमुख व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांची काम करण्याची पद्धत यावर जयंत पाटील बोलत असताना, एक मद्यधुंद इसम नारे देत धावत जाऊन थेट मंचावर चढला. त्याला खाली उतरवण्यासाठी कार्यकर्ते व पोलीस धावले आणि उचलून त्याला बाहेर नेले. काही क्षण उडालेला गोंधळ पुन्हा शांत झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळसह उपस्थित या प्रकाराने अचंबित झाले. मात्र, जयंत पाटील यांनी सर्वांना सबुरीचा सल्ला दिला.
आणि तो स्टेजवर चढून नारे देऊ लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 01:13 IST
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना मद्यधुंद इसम नारे देत धावत आला आणि थेट स्टेजवर चढला. त्यामुळे काही क्षणापुरता गोंधळ निर्माण झाला होता. उपस्थित पोलीस व कार्यकर्त्यांनी त्याला तात्काळ स्टेजवरून उचलून बाहेर नेले आणि जयंत पाटलांचे भाषण पुन्हा सुरू झाले.
आणि तो स्टेजवर चढून नारे देऊ लागला
ठळक मुद्देपरिवर्तन सभा : जयंत पाटलांच्या भाषणात व्यत्यय